MB NEWS:हरकती मांडून दरवाढ थांबवा-चंदुलाल बियाणी

 महावितरणची प्रस्तावित  वीज दरवाढ आपणच रोखू शकतो !



हरकती मांडून दरवाढ थांबवा-चंदुलाल बियाणी

परळी/ प्रतिनिधी-

महावितरणने एका जाहीर सूचनेद्वारे राज्यातील सर्व प्रकारच्या विज ग्राहकांच्या वीज दरावाढीचा प्रस्ताव अधिक्षक अभियंता (वीज दर नियमक कक्ष)  यांच्यासमोर मांडला असून येत्या काळात राज्यातील वीज ग्राहकांना मोठ्या दरवाढीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. प्रस्तावित दरवाढीच्या संदर्भात महावितरणने हरकती आणि आक्षेप मागविल्या असून एक वीज ग्राहक म्हणून आपणच हरकतीद्वारे ही दरवाढ रोखू शकतो असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हा उपाध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील वीज ग्राहकांसाठी जनजागृती अभियान राविण्यात येत असून ग्राहकांनी हरकतीद्वारे आपला आक्षेप नोंदवावा, असे आवाहन चंदुलाल बियाणी यांनी केले आहे.

राज्यातील वीज ग्राहकांच्या समस्या जशास तशा असतांना, वीज चोरी आणि गळती थांबविण्यात अपयश आलेले असताना तसेच महावितरणमधील भ्रष्टाचार रोखण्यात अपयश आलेल्या महावितरणने आपले नुकसान भरुन काढण्यासाठी वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव समोर ठेवला आहे. या दरवाढीला आम्ही कडाडून विरोध करित असून आ. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यातील वीज ग्राहकांसाठी आक्षेप नोंदविण्याबाबत रा.कॉ.चे जिल्हा उपाध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी वीज ग्राहकांना आवाहन केले आहे. या संदर्भात एक महितीपत्र आणि आक्षेप, हरकत कशी व कोठे नोंदवावी याबाबत 50 हजार माहिती पत्रके वितरीत करण्यास सुरुवात केली आहे. 

सध्याचा वीज दर रुपये 3.36 प्रति युनिट असून पुढील 2 वर्षात तो रुपये 4.50 ते 5.10 रुपये प्रति युनिट होऊ शकतो. सदरची दरवाढ स्विकारली गेली तर वीज ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे. 15 फेब्रुवारी पर्यंत या संदर्भातील आक्षेप, हरकती नोंदविणे आवश्यक असून अधिक्षक अभियंता, प्लॉट न. जी-9, 5 वा मजला, प्रकाशगड, प्रो. अनंत काणेकर मार्ग बांद्रा (पुर्व) मुंबई-400051 येथे टपालाने पाठवावे किंवा suggestions.mtr2022@mahadiscomin  येथे ईमेल द्वारे पाठवावे असे आवाहन चंदुलाल बियाणी यांनी केले आहे. 50 हजार माहिती व आक्षेप पत्र राज्यभरात वितरीत करण्यात येत असून सोबतच विविध प्रकारच्या प्रसार माध्यमांवर त्याची प्रत जनहितार्थ दिली जात आहे. आपणच आपली वीज दरवाढ   याद्वारे रोखणार असून प्रत्येक वीज ग्राहकाने विनाविलंब आपली हरकतपत्रे संबंधीताकडे पाठवावीत असेही आवाहन चंदुलाल बियाणी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार