इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS:औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघात परळीत 90 टक्के मतदान

 औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक:परळीत 90 टक्के मतदान 



परळी वैजनाथ ,प्रतिनिधी

       औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज दिनांक 30 रोजी झालेल्या मतदान प्रक्रियेत परळी तालुक्यातील तीन मतदान केंद्रावर एकूण 90 टक्के मतदान झाले आहे.

        औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. यासाठी परळी तालुक्यात तीन ठिकाणी मतदान केंद्र निर्माण करण्यात आले होते. परळी, धर्मपुरी व सिरसाळा या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. परळी तालुक्यातील एकूण 856 पैकी 772 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती मतदान केंद्र परळी वैजनाथ येथे 535 पैकी 488, सिरसाळा 214 पैकी 190 तर धर्मापुरी येथे 107 पैकी 94 शिक्षक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकंदरीत परळी तालुक्यातील शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची टक्केवारी ही 90.18 इतकी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या