MB NEWS:आसाराम बापूला जन्मठेप !

 आसाराम बापूला जन्मठेप !



मुंबई- बलात्काराच्या आरोपाखाली गेल्या दहा वर्षांपासून कारागृहात असणारे तथाकथित संत आसाराम याला न्यायालयाने एका प्रकरणात दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

आसाराम बापूवर उत्तर प्रदेशच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही मुलगी मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे आसारामच्या आश्रमात शिकत होती.या मुलीच्या आरोपानुसार, आसारामने तिला जोधपूरजवळच्या आश्रमात बोलावलं होतं. आणि ऑगस्ट 15, 2013ला तिच्या बलात्कार करण्यात आला. आसाराम बापू यांच्या खटल्याचा घटनाक्रम 20 ऑगस्ट 2013ला आसारामानी 15 ऑगस्ट रोजी एका मुलीचं लैंगिक शोषण केल्याची तक्रार दिल्लीत दाखल करण्यात आली नंतर हा खटला जोधपूर कोर्टाकडे सोपण्यात आला. 23 ऑगस्ट 2013ला आसारामाविरोधात गुन्हा दाखल झाला.

पण यावर भडकलेल्या आसाराम समर्थकांची कमला मार्केट पोलीस स्टेशनमधे तोडफोड केली. – 28 ऑगस्ट 2013ला पीडित मुलीच्या वडिलांनी आसारामला फाशी देण्याची मागणी केली. तर दुसरीकडे मुलगी मनोरूग्ण असल्याचा दावा आसारामने केला.

दरम्यान 29 ऑगस्ट 2013ला काँग्रेस नेते मुद्दाम त्यांना लक्ष्य करून असले आरोप करत आहेत असा अप्रत्यक्ष आरोप आसारामने केला.31 ऑगस्ट 2013ला आसारामला जोधपूर पोलिसांनी अटक केली, आसारामची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. पण या दरम्यान समर्थकांनी कोर्टाबाहेर गोंधळ घातला होता. नोव्हेंबर 2013ला जोधपूर पोलिसांनी आसाराम विरोधात आरोपपत्र दाखल केलं. आसाराम आणि चार लोकांवर बलात्काराचे आरोप करण्यात आले.

फेब्रुवारी 2014ला आसारामविरोधात कोर्टात सुनावणीला सुरूवात झाली. ज्येष्ठ कायदेतज्ञ राम जेठमलानी यांनी आसाराम बापू यांचं वकीलपत्र घेतलं होतं. आसाराम बापूंना वेगळाच आजार आहे ज्यामुळे ते महिला त्याच्याकडे आकर्षित होतात असा अजब युक्तिवाद कोर्टात करण्यात आला. फेब्रुवारी 2015ला आसाराम बापू केसमधील एक साक्षीदार राहूल सचान जेव्हा आपलं स्टेटमेंट द्यायला कोर्टात चालला होता तेव्हा त्याच्यावर हल्ला करण्यात आला.

8 जुलै 2015ला दुसऱ्या एक साक्षीदार सुधा पाठक साक्षी देण्यावरून मागे फिरल्या आणि त्यांनी कोर्टात सांगितलं की आम्हाला आसाराम बापूबद्दल काहीच माहिती नाही. 12 जुलै 2015रोजी क्रिपालसिंग या साक्षीदारची हत्या शहाजहानपूरमध्ये करण्यात आली. 7 एप्रिल 2018रोजी जोधपूर कोर्टात दोन्ही पक्षांचे युक्तीवाद संपले. आणि आज 25 एप्रिल रोजी त्याच्या शिक्षेवर कोर्टात सुनावणी झाली.

दरम्यान न्यायालयाने या प्रकरणात आसाराम बापूला जन्मठेप सुनावली आहे.त्यामुळे त्यांच्या भक्तांना मोठा धक्का बसला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !