MB NEWS:परळीत जमाअत ए इस्लामी हिंदचा एक रोजा इजतेमा-ए-आम

 परळीत जमाअत ए इस्लामी हिंदचा एक रोजा इजतेमा-ए-आम 




परळी / प्रतिनिधी 

परळी येथे दिनांक २९ जानेवारी २०२३ रविवारी जमाअत ए इस्लामी बीड जिल्ह्याच्या एक रोजा इजतेमा-ए-आम च्या आयोजन करण्यात आला होता.या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून जमाअत ए इस्लामी महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष मौलाना इलयास फलाही सहाब,जमाअत ए इस्लामी हिंद महाराष्ट्र राज्याचे तरबियत विभागचे सचिव डॉ जावेद मुकरम सहाब, जलगावचे सोहेल अमीर साहेब, शफीक फारुखी सहाब पाथरी, मुबश्शिरा फिरदोस बाजी औरंगाबाद आलं होतं

या कार्यक्रमांची सुरुवात कुरान पठाणाने झाली नंतर डॉ जावेद मुकरम सहाब यांनी "सध्याच्या प्रसतीत कुरान आणि सुन्नत काय सांगतात" या विषयावर मुकरम साहेबनी अनेक उदाहरणे देऊन आपलं मनोगत व्यक्त केले नंतर बोलताना सांगितले की आज भारतात मुस्लिम समाजाला जितका अधिकार आणि आझादी आहे तितकी जकात कुठेच नाही.

यानंतर 'इस्लामिक समाज निर्माण करण्यात आमची भूमिका काय आसावी' यावर प्रमुख तीन व्यक्तींनी आपले मनोगत व्यक्त केले सर्वात अगोदर मुबश्शिरा फिरदोस मैडमनी 'लग्ना नंतर जोडीदार, शिक्षक' आणि पालक या विषयावर आपलं मनोगत व्यक्त केले नंतर 'धार्मिक अभ्यासक' या विषयावर मुफ्ती अश्फाक कासमी यांनी आपलं मनोगत व्यक्त केले. नंतर 'राजकीय आणि सामाजिक नेते' या विषयावर शफी फारुकी साहेब यांनी अनेक उदाहरणे देऊन सध्या सध्याच्या राजकारणात जे चालू आहे ते गाव पातळीवर असो किंवा देश पातळीवर यावर आपले मनोगत व्यक्त केले.

या तिन्ही मुद्द्यावर नंतर मौलाना इलियास फलाही साहेब उपाध्यक्ष जमात इस्लाम हिंद महाराष्ट्र यांनी आपले विश्लेषण व्यक्त केले

नंतर सोहेल अमीर साहेब यांनी समाज सुधारण-सध्याच्या परिस्थितीत यावर आपले मनोगत व्यक्त केले.

शेवटी जमाअत ए इस्लामी हिंद यांनी 75 वर्षात काय काय काम केले आणि समाजसुधारणासाठी काय काय उपाययोजना केले यावर इलियासफलाही साहेब यांनी भाषण केलं

या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी जमाअत ए इस्लामी हिंद बीड जिल्हा अध्यक्ष सय्यद इफ्तेखार, परळीचे अध्यक्ष सय्यद अन्वर सोबत पूर्ण परळीचे कार्यकर्त्यांनी  खूप परिश्रम घेतले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार