MB NEWS:विकासपुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय व राज्य पातळीवर करणार पाठपुरावा

 अध्यात्म व विज्ञानातून मराठवाड्याच्या विकासाची दारं खुली करण्याची वेळ आली आहे : स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती


विकासपुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय व राज्य पातळीवर करणार पाठपुरावा


प्रसंगी परळी वैजनाथ येथे आयोजित केली जाणार धर्मसभा


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथे काशी विश्वनाथ, उज्जैनच्या धर्तीवर कॉरिडॉरच्या माध्यमातून विकास करण्यात यावा. 'अध्यात्म व विज्ञानातून मराठवाड्याच्या विकासाची दारं खुली करण्याची वेळ आली आहे' असे प्रतिपादन पीठाधीश्वर श्रीराम शक्तीपीठ संस्थान

राष्ट्रसंत अनंत विभुषीत श्री श्री १००८ महामण्डलेश्वर स्वामी सोमेश्वरानन्द सरस्वतीजी महाराज (पंचायती अखाडा श्री निरजंनी )

श्रीक्षेत्र - चाकोरे (बेझे ) त्र्यंबकेश्वर नाशिक यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना केले.


मराठवाडा ही संतांची आणि कष्टकऱ्यांची भूमी आहे. आता वेळ आली आहे की या भूमीचा शोषणाचा शाप पुसून विकासाचे वरदान येथील भूमिपुत्रांना मिळावे. देशाचे संविधान सर्वांना समानतेचा अधिकार देते त्यानुसार येथील नागरिकांचा विकास होणे क्रमप्राप्त आहे. यासाठी सर्व धार्मिक स्थळ विकसित करून धर्म आणि कर्माची जोड घातली तर आपल्या सर्वांचे कल्याण होईल. याचाच एक भाग म्हणून परळी वैजनाथ येथे प्रभू वैद्यनाथ कॉरिडॉर व्हावे यासाठी सर्वप्रकारे विकासपुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय व राज्य पातळीवर पाठपुरावा करण्याची ग्वाही स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांनी नागरिकांशी संवाद साधताना दिली.


प्रसंगी परळी वैजनाथ येथे आयोजित केली जाणार धर्मसभा

आम्ही संवैधानिकरित्या कॉरिडॉरची मागणी करत आहोत. संघर्षापेक्षा हर्ष, सहर्षाने आंदोलन करत येथील भूमिपुत्रांना न्याय मिळावा यासाठी येथील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन एकमेकांना सहकार्य करत प्रगती साधावी. यासाठी स्वतः स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती पुढाकार घेऊन सर्व लोकप्रतिनिधींची भेट घेणारच आहेत. सोबतच आवश्यकता भासल्यास प्रसंगी परळी वैजनाथ येथे लवकरच धर्मसभा आयोजित केली जाईल अशी घोषणा स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांनी पत्रकार परिषदेत केली.


प्रभू वैद्यनाथांचे स्पर्शदर्शन घेतल्यावर अमृत प्राशनानंतरचे चैतन्य अनुभवले असेही स्वामीजींनी सांगितले


याप्रसंगी पीठाधीश्वर-  श्रीराम शक्तीपीठ संस्थान राष्ट्रसंत अनंत विभुषीत श्री श्री १००८ महामण्डलेश्वर स्वामी सोमेश्वरानन्द सरस्वतीजी महाराज ( पंचायती अखाडा श्री निरजंनी )

महंत श्रीनाथानन्द सरस्वती महाराज,  महंत सिध्देश्वरानन्द सरस्वती महाराज, महंत सुदर्शनानन्द सरस्वती महाराज,  महंत विश्वेश्वरानन्द सरस्वती महाराज, महंत रामानन्द सरस्वती महाराज, महंत शिवानन्द सरस्वती महाराज, डाॅ.आदित्य जाधव, अॅड.दिपक गवळी, मा.श्री नितिन थेटे, मा.श्री प्रसाद ठाकरे, मा.श्री.अमोल कोल्हे, मा.श्री राम जठार, मा.श्री पंकज मोरे व इतर मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !