युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS:राजमुद्रा प्रतिष्ठान आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती

 राजमुद्रा प्रतिष्ठान आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती



 अध्यक्षपदी शाम आवाड उपाध्यक्षपदी केतन जाधव साचिव पदी नितिन धरमे यांची निवड 


परळी दि.30(प्रतिनिधी)  राजमुद्रा प्रतिष्ठान आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती  गंगासागर नगर   अध्यक्ष पदी शाम आवाड तर  उपाध्यक्ष केतन जाधव , सचिव पदी नितिन धर्मे, कोषाध्यक्ष शिवराज वाकडे, कार्याध्यक्ष प्रशांत दराडे, प्रसिद्ध प्रमुख म्हणून शिवहरी  जाधव,  समर्थ हवा यांची निवड करण्यात आली.सदस्य म्हणुन गोविंद गरड, कृष्णा पौळ ,गजानन थळकरी, बालाजी शिंदे, गणेश गिराम ,संतोष मस्के, नितीन पौल, धोंडीराम चाटे ,विशाल जाधव, रवींद्र खोशे, पपु पौल्, बालाजी शिरसाट, परमेश्वर बहादुर,  विष्णू अटुळे, कपिल शिंदे, आकाश लहवले, अक्षय कानडे आदी शिव प्रेमी उपस्थित होते. या वेळी मार्गदर्शक म्हणुन गोपाळ आंधळे, सौ कमल मावशी नाईकवाडे, किशोर जाधव, बळीराम नागरगोजे, अशोक हिंगणे, गणेश खाडे सर ,राजे भाऊ जाधव, शिवजन्मोत्सव सामाजिक, सांस्कृतीक रित्या साजरा करणार असल्याची माहिती राजमुद्रा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष किशोर भाऊ जाधव यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या