इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS:पत्रकार नितीन ढाकणे व दिपक गित्ते यांची निवड

 पत्रकार नितीन ढाकणे व  दिपक गित्ते यांची निवड 

 पत्रकार व संपादक नितीन ढाकणे व पत्रकार दिपक गित्ते यांची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या बीड जिल्हा कार्यकारणीवर निवड 


परळी वैजनाथ/प्रतिनिधी 


परळी येथील निर्भीड पत्रकार संपादक व सामाजिक कार्यकर्ते नितीन ढाकणे यांची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या बीड जिल्हाकार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. व तरुण तडफदार पत्रकार दिपक गित्ते यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र नागपूर येथील बैठकीत ठराव घेऊन नुकतेच त्यांना देण्यात आले आहे. पत्रकार नितीन ढाकणे व दिपक गित्ते यांच्या निवडीचे 


पत्रकार जिल्ह्यातील माहिती अधिकार महासंघ अशा सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. 


नागपूर येथे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या झालेल्या बैठकीत ठराव घेऊन बीड जिल्हाकार्याध्यक्षपदी पत्रकार संपादक नितीन ढाकणे व पत्रकार दिपक गित्ते यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून सदरील निवडीचे नियुक्तीपत्र दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी देण्यात आले आहे. 


मागील तीन वर्षापासून पत्रकार नितीन ढाकणे हे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे परळी तालुका संपर्कप्रमुख म्हणून काम करत होते. याचीच फलश्रुती म्हणून त्यांची जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. 


आपल्या पत्रकारीते बरोबरच सामाजिक आणि आपल्या श्री वैद्यनाथ सेवा भावी संस्थेच्या माध्यमातून नितीन ढाकणे व दिपक गित्ते हे सामाजिक कामात ही अग्रेसर असतात 


या आधी त्यांनी अनेक महत्वाची पदे भूषविली आहेत, नितीन ढाकणे हे कवी सामाजिक अभ्यासक, पत्रकार संपादक ,लेखक ,उत्कृष्ट वक्ते म्हणूनही पंचक्रोशीत ओळखले जातात त्याच प्रमाणे दिपक गित्ते यांचेही सोबतीने प्रभावी कार्य दिसून येते हे दोघेही बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात 


  


माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर व शेखर उर्फ चंद्रभान कोलते कार्याध्यक्ष महाराष्ट्र यांनी पत्रकार नितीन ढाकणे व पत्रकार दिपक गित्ते यांच्या निवडीचे नियुक्तीपत्र दिले आहे. या निवडीचे परळी शहर व तालुक्यातील पत्रकार बांधवासह बीड जिल्ह्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या