MB NEWS:सोशलमिडीयाचे बंधन तोडण्यासाठी संवादाची गरज-डॉ. संतोष मुंडे

 सोशलमिडीयाचे बंधन तोडण्यासाठी संवादाची गरज-डॉ. संतोष मुंडे



परळी वैजनाथ दि.२९ (प्रतिनिधी)

              लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने तालुक्यातील पांगरी येथे विशेष युवती शिबीराचे आयोजन २७ जानेवारी ते ०२ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. या शिबीरात शनिवारी (ता.२८) दुपारच्या सत्रात राष्ट्र विकासात युवकांचे योगदान या विषयावर डॉ संतोष मुंडे बोलत होते.

               लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने 

युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास युवती विशेष शिबीरा दरम्यान शनिवारी दुपारी राष्ट्र विकासात युवकांचे योगदान या व्याख्यानास प्रमुख वक्ते दिव्यांगाचे आधारस्तंभ, सामाजिक कार्यकर्ते डॉ संतोष मुंडे, श्रीनिवास मुंडे, प्रा.शंकर कापसे, कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ विनोद जगतकर, प्रा.डॉ प्रविण दिग्रसकर, प्रा.डॉ रंजना शहाणे, प्रा राजर्षी कल्याणकर, प्रा. प्रविण फुटके, प्रा.विशाल पौळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना डॉ संतोष मुंडे म्हणाले की, आजच्या काळात मोबाईल मुळे संवाद हरवत चालला आहे. संवाद वाढवण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना शिबीराची आवश्यकता आहे. देशाच्या विकासात युवकांची मोठी भूमिका आहे. युवकांच्या योगदानामुळे राष्ट्र विकास होतो. मात्र अलिकडच्या मोबाईलच्या युगात संवाद हरवत चालला असल्याचे प्रतिपादन डॉ मुंडे यांनी केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्रा.डॉ दिग्रसकर यांनी सुत्रसंचालन माधुरी बडे,आभार वैष्णवी बागडे यांनी मानले. कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !