इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS: पंकजाताई मुंडे यांनी केलं केंद्रीय अर्थसंकल्पाचं स्वागत

 सर्व सामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प

पंकजाताई मुंडे यांनी केलं केंद्रीय अर्थसंकल्पाचं स्वागत


बीड  ।दिनांक ०१।

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा तसेच सामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारा आहे, या अर्थसंकल्पात घेण्यात आलेले निर्णय स्वागतार्ह आहेत अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 


   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचं हे महत्वाचं बजेट असून ते पूर्णपणे सकारात्मक आहे. देशातील सामान्य माणसांला चांगले दिवस यावेत यासाठीच मोदी सरकार सत्तेवर आलं आहे, त्यामुळे अर्थसंकल्पात सर्व घटकांचा समान विकास साधण्यात आला आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास याबरोबरच सबका प्रयास देखील यात करण्यात आला आहे असं पंकजाताई म्हणाल्या.


   मोदी सरकारने कोविड काळात घेतलेले निर्णय, लसीकरण मोहिम,  अन्न धान्याचा पुरवठा हया जमेच्या बाजू आहेत. अर्थसंकल्पात सर्व समावेशक विकास साधतांना सरकारने वंचित घटकांना प्राधान्य, पायाभूत सुविधा, हरित विकास अशी विकासाची सप्तर्षी योजना आखली आहे. सर्वांसाठी घर या अंतर्गत पंतप्रधान आवास योजनेसाठीची आर्थिक तरतूद ६६ टक्क्यांनी वाढवून ७९ हजार कोटी रूपये करण्यात आलीयं. ८१ लाख महिला बचतगटाचे सबलीकरण करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आलायं. याशिवाय शेतकऱ्यांना कृषी कर्ज, शेतीसाठी पायाभूत सुविधा, पशूपालन, उद्योगांना चालना तसेच युवकांचा आणि आर्थिक क्षेत्राचा विकास यासाठी देखील यात भरीव तरतूद करण्यात आली आहे. हे बजेट मध्यमवर्गीयांना देखील दिलासा देणारा असल्यानं मी याचं स्वागत करून पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय अर्थमंत्र्यांचं अभिनंदन करते असं पंकजाताई मुंडे यांनी म्हटलं आहे.

••••



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट