MB NEWS:प्रा. किरण पाटील सर्वाधिक मतांनी विजयी होतील - व्यक्त केला विश्वास

 पंकजाताई मुंडे यांच्या औरंगाबाद, बीड, सिरसाळा येथे मतदान केंद्रांना भेटी




प्रा. किरण पाटील सर्वाधिक मतांनी विजयी होतील - व्यक्त केला विश्वास


बीड ।दिनांक ३०। 

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज औरंगाबाद व बीड जिल्हयातील  मतदान केंद्रांना भेटी देऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. भाजप व मित्र पक्षाचे उमेदवार प्रा. किरण पाटील हे सर्वाधिक मतांनी विजयी होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.


   मराठवाडा विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज सर्वत्र उत्साहात आणि शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. भाजप व मित्र पक्षाकडून प्रा. किरण पाटील निवडणुक रिंगणात आहेत.  त्यांच्या प्रचारार्थ पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी जिल्हयात ठिक ठिकाणी प्रचार सभा आणि बैठका घेतल्या होत्या.


    आज पंकजाताई मुंडे यांनी सकाळीच औरंगाबाद येथे बबनराव ढाकणे महाविद्यालयातील मतदान केंद्रांवर भेट दिली. याठिकाणी स्वतः उमेदवार किरण पाटील उपस्थित होते. बीड येथे चंपावती विद्यालयातील बुथला भेट देऊन पंकजाताईंनी भाजपा कार्यकर्ते व शिक्षकांशी संवाद साधला. त्यानंतर पिंपळनेर, सिरसाळा (परळी) येथेही त्यांनी भेट दिली. दरम्यान, या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार  किरण पाटील यांचे पारडे सर्वच ठिकाणी जड आहे, ते सर्वाधिक मतांनी विजयी होतील असा विश्वास पंकजाताईंनी यावेळी बोलतांना व्यक्त केला. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, सर्जेराव तांदळे, डाॅ. लक्ष्मण जाधव, परळी येथे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, उत्तमराव माने यांचेसह पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार