MB NEWS:राज्यस्तरीय भजन स्पर्धेत महिला गटात नागपूरचा संघ अव्वल तर पुरूष गटात अमरावतीने मारली बाजी

 राज्यस्तरीय भजन स्पर्धेत महिला गटात नागपूरचा संघ अव्वल तर पुरूष गटात अमरावतीने मारली बाजी


भजनाने आपल्या जीवनात शक्ती आणी भक्ती निर्माण होते: अपर आयुक्त डाॅ. विजयकुमार फड 




कामगार कल्याण मंडळाच्या भजन स्पर्धा उत्साहात संपन्न 

परळी (प्रतिनिधी):

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे राज्यस्तरीय महिला व पुरूष भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

महिला गटात नागपूर येथील कामगार कल्याण केंद्र कामठीच्या संघाने; तर पुरूष गटात अमरावती येथील कामगार कल्याण केंद्र गांधी चौक या संघाने प्रथम पारितोषिक पटकावला.

औरंगाबाद येथील तापडीया रंगमंदिरात दोन दिवस रंगलेल्या या स्पर्धेत ३८ महिला व पुरुष भजनी संघाने उत्कृष्ट सादरीकरण केले.

या स्पर्धेचे पारितोषिक वितरण मराठवाडा विकास मंडळाचे अपर आयुक्त डाॅ. विजयकुमार फड, कल्याण आयुक्त रविराज इळवे, कामगार उपायुक्त चंद्रकांत राऊत, सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील, कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस, भालचंद्र जगदाळे यांच्या उपस्थितीत झाले.

या स्पर्धेत महिला गटात वरळी येथील कामगार कल्याण केंद्र जुनी धारावी या संघाने  द्वितीय; तर चिपळूण येथील कामगार कल्याण केंद्र सावंतवाडी संघाने तृतीय क्रमांक पटकावला. नाशिक व अकोला संघाने उत्तेजनार्थ बक्षीसे मिळविले. 

पुरूषांच्या गटात  कोल्हापूर येथील कामगार कल्याण केंद्र बिंदुचौक या संघाने  द्वितीय; तर नागपूर-१  येथील कामगार कल्याण भवन  चंदननगर संघाने तृतीय क्रमांक पटकावला. नायगाव व सांगली  संघाने उत्तेजनार्थ बक्षीसे मिळविले. 


संतश्रेष्ठ तुकाराममहाराज, ज्ञादेश्वरमाउली अशा संतमहंतांनी सद्‍भावनेने देवाची मनोभावे भक्ती-आराधना, उपासना करून त्याला प्रसन्न करून घेतले आणि त्यामुळेच त्यांना सद्‍गती प्राप्त झाली. आपण प्रत्येकाने अंतःकरणातुन भजन केल्यास आपल्या जीवनात शक्ती आणि भक्ती निर्माण होऊन चांगले विचार आपल्या मनात येतील, असे यावेळेस डाॅ. विजयकुमार फड म्हणाले. 

या स्पर्धेचे परीक्षण अच्युत कुलकर्णी, जगन्नाथ पुरी, सारिका कुलकर्णी यांनी केले. प्रास्ताविक कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले. तर आभार सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील यांनी मानले. विजय अहिरे यांनी सूत्रसंचालन केले.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी औरंगाबाद विभागतील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !