इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

 दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात 


नेहुल वारुळे, समीक्षा घुमे यांनी विद्यार्थ्यासह मराठमोळ्या गीतावर सादर केला नृत्यविष्कार


परळी (प्रतिनिधी):-दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल चे चौथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात दिनांक 28 जानेवारी 2023 रोजी संपन्न झाले. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गीतावर नृत्य सादर करून आगळावेगळा कलाविष्कार सादर केला.विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गीतामुळे प्रेक्षक अक्षरशा भारावून गेले होते.



         या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ. उषाताई किरण गित्ते, मी होणार सुपरस्टार नेहुल वारुळे, समीक्षा घुमे, मुख्याध्यापक विठ्ठल तुपे, पोद्दार जम्बो किडच्या मुख्याध्यापिका सुरेखा तुपे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी पोद्दार जंबो किड्स च्या विद्यार्थी विद्यार्थिनीं व दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी विविध गाण्यावर नृत्यसादर केले. देवा श्री गणेशा देवा श्री गणेशा या गीताने कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर काळजाच सुप झाल... आरशाला रूप आल...,झिंग झिंग झिंगाट, आदिसह मराठमोळ्या लावण्या, लोकगीते, हिंदी गीते, आदिवासी गीते,पारंपारिक वेशभूषेत नृत्य अविष्कार सादर केला. यामुळे प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते. अनेकांनी सादर केलेल्या गाण्याला टाळ्यांच्या प्रतिसादात दाद दिली. सैराट चित्रपटातील झिंग झिंग झिंगाट या गीतावर सर्व विद्यार्थ्यांसह नेहुल वारुळे, समीक्षा घुमे यांनी नृत्य सादर केले. यावेळी विद्यार्थ्या समवेत विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा सौ. उषाताई गित्ते याही उपस्थित होत्या. स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या स्नेहसंमेलन विद्यार्थी व विद्यार्थिनी पालक आदि मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!