परळीचे सुपुत्र जिल्हा न्यायाधीश कृष्णगोपाल तोतला सेवानिवृत्त
![इमेज](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjEiAhIktL-v3VksCPw-MtHt9H1tMZMR32fLeavegL-80SX66FRdjSvpPHSqk5RQi1IAu24Qqw_Z31kJQCdiypcQq2Z5E_gi9gnLLndLH60uYuy6bFGdwpy1PbWW-bnGOvB41m3lSD2hKUZffVjHAyIkl1SoWxURHSU9mVRqJDdW9_8tWemEBDZ22D5R_g/s320/IMG-20231202-WA0050.jpg)
परळीचे सुपुत्र जिल्हा न्यायाधीश कृष्णगोपाल तोतला सेवानिवृत्त परळी .... प्रतिनिधी.... परळी चे सुपुत्र तथा लातूर येथील जिल्हा न्यायाधीश कृष्णगोपाल तोतला हे तब्बल 28 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर 30 नोव्हेंबर रोजी न्यायाधीश या सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांचा लातूर येथे भव्यदिव्य असा निरोप समारंभ पार पडला. वकिली व्यवसायापासून आपल्या सेवेची सुरुवात करून 1995 मध्ये न्यायाधीश या पदावर रुजू होऊन मुंबई, संभाजीनगर, उल्हासनगर, नागपूर, नांदेड,अशा विविध ठिकाणी न्यायाधीश तसेच सहाय्यक धर्मादाय आयुक्त या पदावर आपल्या कार्याची एक आगळीवेगळी छाप टाकणारे परळीचे सुपुत्र कृष्ण गोपाल तोतला हे 30 नोव्हेंबर 2023 रोजी सेवानिवृत्त झाले.लातूर येथील न्याय मंदिराच्या भव्य अशा सभागृहामध्ये त्यांचा निरोप समारंभ पार पडला. त्यांच्या या निरोप समारंभाच्या वेळी लातूरचे मुख्य न्यायाधीश, वकील संघाचे सर्व पदाधिकारी, व वकील संघाचे सदस्य, आणि न्याय मंदिरातील विविध पदावर काम करणारे क्लार्क व कर्मचारी यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित होते. अत्यंत भावनिक अशा पार पडलेल्या या समारंभात अनेकांनी आपल्या भावन