■ प.पु.आचार्य अमृताश्रम स्वामी महाराजांना महाराष्ट्र शासनाचा मानाचा पुरस्कार: परळीकरांच्या वतीने ह्रदय सत्कार

■ प.पु.आचार्य अमृताश्रम स्वामी महाराजांना महाराष्ट्र शासनाचा मानाचा पुरस्कार: परळीकरांच्या वतीने ह्रदय सत्कार




परळी वैजनाथ,प्रतिनिधी..

       बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र व महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील थोर विभूती,अध्यात्मिक क्षेत्राचा सन्मान नवगण राजुरी येथील प.पू.आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज (जोशीबाबा) यांना महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून किर्तन प्रबोधन या विभागातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला. त्याबद्दल परळी वैजनाथ येथे स्वामीजींचा ह्रदय सत्कार करण्यात आला.

          वै.ह.भ.प. रामेश्वर महाराज गुट्टे यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित कथा किर्तन महोत्सवात प.पू.आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज (जोशीबाबा) यांची किर्तनसेवा झाली.या  महोत्सवातील संपुर्ण किर्तने व कथा याचे 'झी टॉकीज 'च्या 'मनमंदिरा' कार्यक्रमात प्रसारण होणार आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे या महोत्सवाचे चित्रिकरण झाले. महोत्सवातील समारोपीय सत्रात  ह.भ.प.श्री.अमृताश्रम स्वामी महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. 

         यावेळी  आचार्य अमृताश्रमस्वामी महाराज  यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्काराबद्दल तमाम परळीकरांच्या वतीने ह्रदय सत्कार करण्यात आला. यावेळी आळंदी येथील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे पुर्व अध्यक्ष ह.भ.प.केशव महाराज उखळीकर, परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी,डॉ.अरुण गुट्टे, ह.भ.प भरत महाराज गुट्टे, डॉ.विठ्ठल गुट्टे यांच्यासह दत्ताभाऊ देशमुख,वैजनाथराव चाटे,भागवताचार्य ह.भ.प.बाळू महाराज जोशी उखळीकर, मृदंगाचार्य भरत महाराज सोडगिर, हभप जगदीश महाराज सोनवणे,पत्रकार प्रा.रविंद्र जोशी,संभाजी मुंडे,अनंत कुलकर्णी, विकास वाघमारे,स्वानंद पाटील,शेळके, आदी मान्यवर व श्रोतेगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार