डिसेंबरच्या पहील्या आठवड्यात प्रवाश्यांच्या समस्या सुटणार

परळी-सिरसाळा दुहेरी रस्त्यावर एका बाजूने होणार सुरळीत वाहतूक



खा.प्रितमताई मुंडे यांनी दिल्या राष्ट्रीय महामार्ग विभागाला सूचना ; डिसेंबरच्या पहील्या आठवड्यात प्रवाश्यांच्या समस्या सुटणार

बीड। दि. ०१ । राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 एफ या मार्गावर परळी ते सिरसाळा दरम्यान सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या कामामुळे वाहतूक धारकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो आहे. या परिसरातील नागरिक आणि प्रवाश्यांच्या तक्रारींची दखल घेऊन खा.प्रितमताई मुंडे यांनी दिनांक २९ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदारांची बैठक घेऊन रस्त्याच्या एका बाजूने वाहतुक सुरळीत सुरू राहण्यासाठी विविध सूचना केल्या.

परळी-सिरसाळा मार्गाच्या दुहेरीकरणामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे एकाचवेळी खोदकाम करण्यात आल्याने यया मार्गावरील वाहतुकीत अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. या मार्गाहुन प्रवास करणारे वाहतूकधारक आणि प्रवासी रस्त्याच्या हे दुरावस्थेमुळे त्रस्त असल्याची बाब समजताच खा.प्रितमताई मुंडे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाची बैठक बोलावली आणि रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी सुरळीत करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

राष्ट्रीय महामार्ग विभागाने वाहतुकीला होणारे अडथळे दूर करण्यासाठी एका बाजूने मुरूम भरायचे काम करताना दुसरी बाजू सुरळीत ठेवण्याचे काम हाती घेणार असल्याचे यावेळी सांगितले. मुरूम भरताना धूळ नियंत्रित करण्याकरिता नियमित पाणी टाकणे, पुलांच्या रुंदीकरणाचे काम सुरू करणे, रस्त्याचे काम प्रगतीपथावर असल्याने जड आणि मोठी वाहतूक पर्यायी रस्त्याने वळविती करण्याकरिता परिवहन विभागासोबत चर्चा करणे अशा विविध सूचना खा.प्रितमताई मुंडे यांनी विभागाला दिल्या आहेत. त्यांनी दिलेल्या सूचना आणि नागरिकांप्रति दाखवलेल्या कर्तव्यदक्षतेमुळे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परळी-सिरसाळा रस्त्याची एक बाजू वाहतूकीसाठी सुरळीत होणार आहे. 

तसेच या बैठकीत परळी बाह्यवळण रस्त्याच्या जंक्शनची तात्काळ दुरुस्ती करण्याच्या ही सूचना त्यांनी दिल्या आहेत. नाथ्रा फाट्याजवळ खोल खोदकाम केल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने दक्षता घेण्याची बाब खा.प्रितमताईंनी विभागाच्या निदर्शनास आणून दिली. सिरसाळा गावाजवळील पेट्रोल पंपासमोर करण्यात आलेल्या खोल खोदकामामुळे होणारी वाहतूक कोंडीची समस्या देखील खा.प्रितमताई मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे सुटणार आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रीय महामार्ग 561 व 361एफ आणि बीड शहरातील अडीच किमीच्या कामाचा ही आढावा घेतला. दरम्यान परळी ते बीड रस्त्याचे चौपदरीकरण करण्याची आणि बीड शहरातून जाणाऱ्या मार्गाचे मजबूतीकरण करण्याची सातत्यपूर्ण मागणी खा.प्रितमताई मुंडे यांनी अनेकवेळा केंद्र सरकार कडे केली आहे, त्यांच्या या मागणीला अंशत यश मिळत असल्याचे अधोरेखित होत आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार