महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024 स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024 स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर


नवी दिल्ली, 28 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.  वेळापत्रकानुसार, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 28 एप्रिल  2024 रेाजी घेण्यात  येणार असून, राज्यसेवा मुख्य परीक्षा 14 ते  16  डिसेंबर 2024 या कालावधीत घेण्यात येणार आहे. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या  संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, इतर महत्त्वाच्या परीक्षांची तारीख पुढीलप्रमाणे राहणार आहे:

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024  -  16 जुन  2024


महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024  -  29 सप्टेंबर  2024


दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग  पूर्व परीक्षा 2024  -  17 मार्च  2024


दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग  मुख्य  परीक्षा 2024 -  27 जुलै 2024


सहायक मोटार वाहन निरिक्षक  मुख्य परीक्षा 2024 - 26 ऑक्टोबर 2024


महाराष्ट्र गट –क सेवा मुख्य परीक्षा 2024  - 17 नोव्हेंबर  2024


अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य  परीक्षा 2024  -   9 नोव्हेंबर  2024


महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी  सेवा मुख्य परीक्षा  2024  -   10 नोव्हेंबर  2024


महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परिक्षा  2024  -   10 नोव्हेंबर  2024


महाराष्ट्र यांत्रिकी  अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा परीक्षा 2024  -   23 नोव्हेंबर  2024


महाराष्ट्र विद्युत  अभियांत्रिकी  सेवा मुख्य परीक्षा 2024   -  23 नोव्हेंबर 2024


महाराष्ट्र स्थापत्य  अभियांत्रिकी  सेवा मुख्य परीक्षा 2024  -  23 नाव्हेंबर  2024


निरीक्षक वैधमापन शास्त्र मुख्य परीक्षा 2024  -   1 डिसेंबर  2024


महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2024  -   28,29, 30 व  31  डिसेंबर  2024


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने  वेळापत्रकासोबत नमूद केले आहे की, हे वेळापत्रक शासनाकडून संबंधित संवर्ग पदांसाठी विहित वेळेत मागणी पत्र प्राप्त होईल या गृहितकावर आधारित आहे. शासनाकडून विहित वेळेत मागणी पत्र प्राप्त झाल्यास नियोजित महिन्यांमध्ये पदे विज्ञापित करणे आणि वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल. वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीचे अथवा परीक्षांच्या प्रस्तावित महिना/दिनांकामध्ये कोणताही प्रकारचा बदल होऊ शकतो, बदल झाला तर आयोगाचे संकेतस्थळावर तसे प्रसिद्ध करण्यात येईल. अंदाजित वेळापत्रकाबाबतची सद्यस्थिती दर्शविणारी अद्यावत माहिती वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. संबंधित परीक्षेची परीक्षा योजना, अभ्यासक्रम, निवड पद्धत इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे/येईल व आयोगाच्या धोरणानुसार वेळावेळी अद्यायावत करण्यात येईल. संबंधित परीक्षेमधून भरावयाच्या पदसंख्येबाबतचा सविस्तर तपशील जाहिरात/ अधिसूचनेव्दारे उपलब्ध करुन देण्यात येईल. याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या https://mpsc.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !