मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

 खा.डाॅ.प्रितम मुंडे यांच्या शुभहस्ते प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत रस्त्यांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा



बीड, प्रतिनिधी...
       बीड लोकसभा मतदारसंघाच्या विक्रमादित्य लोकप्रिय खा.डाॅ.प्रितम  मुंडे यांच्या  माध्यमातून जिल्ह्यात विविध विकासात्मक घोडदौड सुरु आहे. त्या अनुषंगानेच जिल्ह्य़ात विविध ठिकाणी मंजूर करण्यात आलेल्या रस्त्यांचे भूमिपूजन व तयार झालेल्या रस्त्यांचे लोकार्पण दि.२७ व २८ रोजी खा.डाॅ.प्रितम  मुंडे यांच्या शुभहस्ते  होणार आहे.
        भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली विविध विकासात्मक कामांची अखंडित श्रृंखला सुरु आहे. विविध विकासकामांमध्ये आवश्यक त्या ठिकाणी रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर कामे सुरु आहेत. यामध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत रस्त्यांची अनेक कामे पूर्ण झाली आहेत तर अनेक नवीन कामे मंजूर करण्यात आलेली आहेत. यापैकी तालुका हद्द केज ते टोकेवाडी-खडकी-कान्होबाचीवाडी- बुरुसदरा-सरकारखोरी- वडवणी-राम्मा 548 बी. बहेगव्हाण राम्मा 561 इजिमा 67 चिंचोली रोडजवळ. कामाचे नाव : राम्मा ५६१-वडवणी ते चिंचोटी-हरिचंद्र पिंपरी तांडा-चिंचवडगाव रस्त्याचे भूमिपूजन : दि. २७ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वा. होणार आहे. तर
सांगवी सरणी ते बेळगाव रामा 222 रस्त्याचे उद्घाटन : दि. २७ नोव्हेंबर २०२३  रोजी संध्याकाळी ०६ वा. त्याचबरोबर चंदन सावरगाव ते कळंबा या रस्त्याचे उद्घाटन 27 नोव्हेंबर 2023 सायं. ०७ वा.होणार आहे.रामा 561 साबलखेड चिंचोली प्रजिमा 07 रस्त्याचे भूमिपूजन दि. २८ नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी ११ वा होणार आहे.
       बीडच्या विक्रमादित्य खा.डॉ. प्रितम गोपीनाथराव मुंडे (लोकसभा सदस्य, बीड) यांच्या शुभहस्ते होणाऱ्या या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !