पनौती,क्रिकेट,वैयक्तिक टीका यापेक्षाही संभाव्य पाणीटंचाई, दुष्काळ,महागाई हे मुद्दे इले.मीडियाने मांडावेत - सेवकराम जाधव

पनौती,क्रिकेट,वैयक्तिक टीका यापेक्षाही संभाव्य पाणीटंचाई, दुष्काळ,महागाई  हे मुद्दे इले.मीडियाने मांडावेत - सेवकराम जाधव




परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

क्रिकेट हा खेळ आहे  कोण हरेल कोण जिंकेल. कोणी कुठे जाऊन जुगार खेळायचा न खेळायचा,

कोण हरलं, पनौती कोण ठरलं, कोणत्या देशात जाऊन कोणी आणि किती सट्टा लावला..? या गोष्टी रात्रंदिवस चघळत बसून इले.मीडियाला काय साध्य करायचे असेल बरं..?

 यावर्षी खूप कमी प्रमाणात पाऊस पडला असल्याकारणाने दुष्काळाचे संकट वाढले असून शेतकरी आत्महत्या करत आहेत. पुढील पावसाळ्यासाठी सहा महिने बाकी आहेत. मागील वर्षीपेक्षा यावर्षी एक इंचही पाणी पातळी वाढलेली नसून येणाऱ्या काही दिवसांमध्ये पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेल. हिवाळ्यामध्येच  बोर आणि विहिरीचे पाणी आटत आहे. छोटे मोठे तलाव अर्धवट भरली नाहीत.येणाऱ्या काळात पाण्याची खूप मोठ्या प्रमाणात बचत करावी लागणार आहे. या सर्व कारणांनी शेतकरी आत्महत्या करत आहेत. महागाई गगनाला भिडली आहे. याबद्दल जर इले.मीडिया वाले बोलले तर दंड पडेल का..? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते सेवकराम जाधव यांनी उपस्थित केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !