सामाजिक कार्यकर्ते चेतन सौंदळे यांच्या निवेदनाची घेतली दखल

 कार्तिक पोर्णिमेनिमित्त कपीलधार जाण्याकरिता रा.प.बीड विभागाकडून 75 जादा बसेस ची सोय




सामाजिक कार्यकर्ते चेतन सौंदळे यांच्या निवेदनाची घेतली दखल


परळी वैजनाथ/प्रतिनिधी

श्री.वैद्यनाथ ज्योतीर्लिंग क्षेत्र परळी - वैजनाथ सह जिल्हयातील विविध ठिकाणाहून 75 जादा बसेस चे नियोजन दि.25 नोव्हें ते दि.27 नोव्हें दरम्यान भाविक-भक्तांसाठी श्रीसंत मन्मथ स्वामी यांच्या संजीवन समाधीदर्शन व यात्रेनिमित्त श्रीक्षेत्र कपीलधार जाणा-या व येणा-या भाविक-भक्तांसाठी केले आहे.

अधिक(जादा) बसेसची सोय करण्याची मागणी राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समिती,परळी अध्यक्ष तथा नगरसेवक चेतन सौंदळे व सर्व पदाधिकारी यांच्यावतीने राज्य परीवहन परळी आगारप्रमुख श्री.संतोष महाजन यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली होती याची दखल राज्य परीवहन विभाग,बीड यांनी घेऊन जादा बसेस नियोजना संदर्भातील लेखी पत्र चेतन सौंदळे यांना दिले आहे.

लेखी पत्रात परळी-वैजनाथ येथून 18,अंबाजोगाई-11 बीड-10,धारूर10,  माजलगांव07,गेवराई 07,पाटोदा 07,आष्टी05,अशा एकूण 75 जादा बसेसची सोय करण्यात आल्याचे नमुद केले आहे.

कार्तिक पोर्णिमादिनी श्री.संत मन्मथ स्वामी यांच्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त त्यांच्या संजीवन समाधीचे दर्शन करण्याकरिता महाराष्ट्रसह ईतर राज्यातून लाखो भाविक-भक्त दर्शनासाठी श्री.वैद्यनाथ ज्योतीर्लिंग क्षेत्र परळी-वैजनाथ येथून श्री.संत मन्मथ स्वामींच्या संजीवन समाधीचे दर्शन करण्यासाठी कपीलधार किंवा तेथून प्रभू वैद्यनाथाचे दर्शन करण्याकरिता परळी येथे येतात त्यांच्या प्रवासाच्या सोयीकरिता अधिकच्या बसेस या दोन्ही तसेच विविध ठिकाणाहून सोडण्याची मागणी करण्यात आली होती त्यानुसार रा.प.विभाग,बीड यांनी नियोजन केले आहे.

सदरील जादा बससेवा सुरू केल्याबद्दल बीड जिल्हयाचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे,बीड रा.प.विभाग नियंत्रक श्री.अजय मोरे,परळी बस स्थानकाचे आगार व्यवस्थापक श्री.संतोष महाजन यांच्यासह बीड व परळी रा.प.विभागातील सर्व कर्मचारी वृंदाचे आभार व समाधान भाविक-भक्त तसेच राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष चेतन सौंदळे यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांच्यावतीने व्यक्त करण्यात आले आहे.

रा.प.विभागामार्फत सुरू केलेल्या बसेसचा लाभ सर्व  भाविक-भक्त व महिला-भगिणी यांनी घेण्याचे आवाहन श्री.सौंदळे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार