शिवा संघटनेच्या 28 व्या राज्यव्यापी मेळाव्यास उपस्थित रहा- अनिल अष्टेकर

शिवा संघटनेच्या 28 व्या राज्यव्यापी मेळाव्यास उपस्थित रहा- अनिल अष्टेकर


परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

           शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचा 28 वा राज्यव्यापी मेळावा व श्री संत शिरोमणी मन्मथस्वामी महाराज यांच्या संजीवनी समाधीची शासकीय महापूजा उद्या 26 नोंहेबर दुपारी 4.00 वाजता तीर्थक्षेत्र कपिलधार जि.बीड येथे बीड जिल्हाचे पालकमंत्री तथा कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे , शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे,माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर, जिल्हाधिकारी, माजी मंत्री चंद्रकांत खैरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष अभय कल्लावार ,सरचिटणीस उमाकांत अप्पा शेटे, तसेच गुरूवर्य, शिवाचार्य, आमदार, खासदार यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

शिवा संघटनेच्या 28 व्या राज्यव्यापी मेळाव्यास कृषी मंत्री ना.धनंजपय मुंडे, शिक्षण मंञी दिपक केसरकर,माजी मंत्री अतुल सावे व संस्थापक अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे सर व शिवाचार्य मार्गदर्शन करणार आहेत.या मेळाव्यात शिवा संघटनेच्या वतीने अहमदपुरकर मढाचे राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना वयाच्या 14 व्या वर्षी युवा संत ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे.शिवा संघटनेच्या प्रयत्नाने कपिलधारला तिर्थक्षेत्र व पर्यटनाचा दर्जा मिळाला असून या ठिकाणी शासनाच्या वतीने भरघोस निधी मिळाला असून मोठ्या प्रमाणात बेलवनची निर्मिती होत आहे तरी समाजाची दिशा ठरवण्याकरिता उद्याच्या शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या मेळाव्यास उपस्थित रहावे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !