वैद्यनाथ भक्ती मंडळाचे कार्य तरूणांसाठी प्रेरणादायी

 वैद्यनाथ भक्ती मंडळाचे कार्य तरूणांसाठी प्रेरणादायी

द्विवर्षपूर्तीनिमित्त स्नेहमिलन कार्यक्रमासह विविध कार्यक्रम; परळीकरांची मोठी उपस्थिती



परळी (प्रतिनिधी)

धर्मवीर सामाजिक युवा प्रतिष्ठान संचलित वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या वतीने परळी वैजनाथ येथील औद्योगीक वसाहत सभागृह येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले. दि.२६ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात हरे कृष्णा (इस्कॉन) यांच्या वतीने भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रभू श्रीराम, प्रभू वैद्यनाथ,  पंढरीचा विठ्ठल पांडुरंग, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे व भगव्या ध्वजाचे पुजन करण्यात आले. त्याचबरोबर २६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. संविधान दिवस असल्याने संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या स्थापनेस दोन वर्षे पूर्ण होत असल्यामुळे या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या वतीने आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमास परळी शहराच्या विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरूवातील वैद्यनाथ भक्ती मंडळाचे सेवेकरी प्रा.अतुल दुबे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात भक्ती मंडळाच्या स्थापनेपासूनच्या कामकाजाबद्दल उपस्थितांना अवगत केले. ते म्हणाले की, 13 नोव्हेंबर 2021 रोजी वैद्यनाथ भक्ती मंडळाची स्थापना करण्यात आली. तेंव्हापासून देवभूमी असलेल्या परळी पंचक्रोशीतील मंदीरांची साफसफाई व रंगरंगोटी, हरिहर तीर्थ, मार्कंडेश्वर तीर्थ, गौशाळा आदींची साफसफाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. त्याचबरोबर गौशाळेला चारा, रेल्वे स्थानकाची स्वच्छता मोहीम आदी उपक्रम राबवण्यात आले. प्रत्येक सुट्टीच्या दिवशी भक्ती मंडळाच्या सदस्यांच्या वतीने शहरात सामाजिक आणि धार्मिक उपक्रम हाती घेतले जातात. कर्म हाच धर्म…. हे ब्रिद घेवून शहरातील प्रत्येक क्षेत्रातील जवळपास २५० पेक्षा जास्त सदस्य निस्वार्थ सेवेत सहभागी होत आहेत. हे कार्य तरूण युवक युवतींसाठी प्रेरणादायी ठरत असून, समाजाचा धार्मिक, सामाजिक, शैक्षणीक आदी विकास व्हावा यासाठी पोषक ठरत आहे. परळीच्या सांस्कृतीक व वैचारीक चळवळींमध्ये या कामांमुळे मोठीच भर पडत असल्याचे मनोगत अनेकांनी या कार्यक्रमात व्यक्त केले. विविध व्यापारी महासंघाचे अध्यक्ष माऊली फड, भक्ती मंडळाचे सेवेकरी ॲड.राजेश्वरराव देशमुख यांनी मौलीक विचार व्यक्त केले. याप्रसंगी भक्ती मंडळास सहकार्य करणारे व त्याचबरोबर सामाजिक व धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्यक्तींचा वैद्यनाथ कथासार हे पुस्तक व पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला. शिवप्रसाद शर्मा यांनी हनुमान चालीसा पठण केली , पत्रकार दत्तात्रय काळे यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले तर कार्यक्रमाच्या शेवटी दिनेश लोंढे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. वंदे मातरम्‌ गीताने कार्यक्रमाची स्नेहमिलन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार