युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

मराठा आरक्षणासाठी केली होती आत्महत्या

 मोरे कुटुंबीयास शासनाची दहा लाखांची मदत

पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या प्रयत्नातून तातडीने मदत कुटुंबियांना सुपूर्द


परळी वैद्यनाथ (दि. 28) - मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीतून आत्महत्या केलेल्या परळी वैद्यनाथ तालुक्यातील गोवर्धन (हि.) येथील तरुणाच्या कुटुंबाला राज्य शासनाच्या वतीने 10 लाखांची मदत पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून तातडीने मंजूर करण्यात आली असून, या रकमेचा धनादेश संबंधित कुटुंबास आज प्रशासनाच्या वतीने सुपूर्द करण्यात आला.


परळी तालुक्यातील गोवर्धन गावच्या गंगाभीषण मोरे या तरुणाने काही दिवसांपूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीतून आत्महत्या केली होती. मोरे यांच्या कुटुंबियास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी यशस्वी प्रयत्न केले. 


आज मोरे कुटुंबाला 10 लाखांची मदत धनादेशाच्या स्वरूपात परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. यावेळी लक्ष्मण तात्या पौळ, राजाभाऊ चाचा पौळ, दत्ता मोरे, गणेश पौळ, भागावत रासवे, बीबीशन जाधव, वैजनाथ जाधव, नायब तहसिलदार बाबुराव रुपनर, यांसह मयत मोरे यांच्या पत्नी श्रीमती कविता मोरे व कुटुंबातील अन्य सदस्य उपस्थित होते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या