वै.ह.भ.प रामेश्वर महाराज गुट्टे यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजन

 परळीत पाच दिवशीय कथा -किर्तन महोत्सवास प्रारंभ: झी टॉकिज 'मनमंदिर' वर होणार प्रसारण         


परळीवैजनाथ: तालुक्यातील नंदनज येथील वै.ह.भ.प रामेश्वर महाराज गुट्टे यांच्या पुण्यस्मरणार्थ गुट्टे परिवार आयोजित येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर मध्ये  झी टॉकिज प्रस्तुत  कथा -किर्तन महोत्सवामध्ये  ह.भ.प. अनुराधा दिदि शेटे यांचा गजर किर्तनाचा कार्यक्रम(12 ज्योतिर्लिंग  कथा) दि. 25 नोव्हेंबर पासून सुरू झाला आहे.विमा विकास आधिकारी ओमकेश दहीफळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. व   अनुराधा दिदीचे स्वागत करण्यात आले.यावेळी सो.क्ष.कासार समाजाचे अध्यक्ष संजय वानरे,परळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक  अरुण गुट्टे,भारत महाराज गुट्टे ,अमोल महाराज गुट्टे, ओमकेश दहीफळे   सौ.शुभांगी वानरे ,सौ .गीता वानरे  व  संजय खाकरे  व्यासपीठावर  उपस्थित होते.                      दिं.२५  ते दि. 29 नोव्हेंबर, 2023 या कालावधीत रोज सकाळी 10 ते 2 या वेळेत नटराज रंगमंदीर परळी  येथे कथा  होणार आहे.या कार्यक्रमाचे औचित्य साधून   ह.भ.प. अनुराधा दिदि शेटे( पंढरपूर )यांचे  सो.क्ष.कासार समाज परळी वैजनाथ च्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.सर्व प्रथम  छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आगमन झाल्यानंतर पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बाईक रॅलीने परळी शहरातून शोभायात्रा काढून प्रत्येक समाज बांधवांनी ठिकठिकाणी त्यांचे स्वागत  व सत्कार केला.

       यावेळी कासार समाजाचे अध्यक्ष - संजय वानरे, उपाध्यक्ष - प्रियेश कासार, सचिव श्री देवेंद्र कासार, कार्याध्यक्ष - श्री पंकज दहातोंडे, कोषाध्यक्ष - श्री अमोल वानरे तसेच श्री मधुकरराव तांबट, श्री दिलीप गांडूळे, श्री चंद्रकांत पाथरकर, श्री विजय गांडूळे, श्री सूर्यकांत तांबट, श्री राजाभाऊ दहातोंडे, श्री प्रदीप पाथरकर, शंकर काटकर, किशोर काटकर, सुनील वानरे, गणेश दहातोंडे, श्रीकांत पाथरकर, शाम वानरे, नितीन तांबट, महेश गांडूळे, अतिष दहातोंडे, विशाल दहातोंडे, योगेश दहातोंडे, गजानन दहातोंडे, अमोल जगधने, गोपाळ दहातोंडे, अशोक दहातोंडे, शिवकुमार पानपट, धोंडीराम दहातोंडे, निलेश कासार, वैजनाथ कासार, साहिल तांबट, सुमित काटकर, विकास पाथरकर व समाजातील सर्व समाज बांधव व भगिनी सुद्धा जास्तीत जास्त संख्येने उपस्थित होत्या.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार