परळीचे सुपुत्र जिल्हा न्यायाधीश कृष्णगोपाल तोतला सेवानिवृत्त

 परळीचे सुपुत्र जिल्हा न्यायाधीश  कृष्णगोपाल तोतला सेवानिवृत्त



परळी .... प्रतिनिधी.... परळी चे सुपुत्र तथा लातूर येथील जिल्हा न्यायाधीश  कृष्णगोपाल तोतला हे तब्बल 28 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर 30 नोव्हेंबर रोजी न्यायाधीश या सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांचा लातूर येथे भव्यदिव्य असा निरोप समारंभ पार पडला.

वकिली व्यवसायापासून आपल्या सेवेची सुरुवात करून 1995 मध्ये न्यायाधीश या पदावर रुजू होऊन मुंबई, संभाजीनगर, उल्हासनगर, नागपूर, नांदेड,अशा विविध ठिकाणी न्यायाधीश तसेच सहाय्यक धर्मादाय आयुक्त या पदावर आपल्या कार्याची एक आगळीवेगळी छाप टाकणारे परळीचे सुपुत्र कृष्ण गोपाल तोतला हे 30 नोव्हेंबर 2023 रोजी सेवानिवृत्त झाले.लातूर येथील न्याय मंदिराच्या भव्य अशा सभागृहामध्ये त्यांचा निरोप समारंभ पार पडला. 

त्यांच्या या निरोप समारंभाच्या वेळी लातूरचे मुख्य न्यायाधीश,  वकील संघाचे सर्व पदाधिकारी, व वकील संघाचे सदस्य, आणि न्याय मंदिरातील विविध पदावर काम करणारे क्लार्क व कर्मचारी यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित होते. अत्यंत भावनिक अशा पार पडलेल्या या समारंभात अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करून श्री तोतला यांना निरोप दिला. यावेळी मुख्य न्यायाधीश यांनी आपली भावना व्यक्त करताना सांगितले, की श्री तोतला यांचे लातूर येथील योगदान तसेच त्यांनी इतर ठिकाणी केलेले काम हे येणाऱ्या पिढीस नक्कीच प्रेरणादायी ठरेल असे ते म्हणाले. यावेळी कार्यक्रमास हजेरी लावलेल्या अनेकांचे डोळे पानावले होते .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार