श्रीविठ्ठल समानतेचा,समचरण , समदृष्टी असलेला मनमोहक अवतार आहे :दत्ता महाराज आंधळे

 श्रीविठ्ठल समानतेचा, समचरण , समदृष्टी असलेला मनमोहक अवतार आहे :दत्ता महाराज आंधळे 



पुणे(प्रतिनिधी)

भगवंताच्या अनेक अवतारांचे वर्णन असले तरी समचरण व समदृष्टी असलेला देव ,केवळ भक्तांचे कैवारासाठी अवतार धारण करतो.श्रीविठ्ठलाचे  रुप सर्वांना आकर्षित करुन घेते असे प्रतिपादन संतवाड़्मयाचे संशोधक ह.भ.प.ॲड . दत्तात्रय महाराज आंधळे यांनी केले.

मुळशी खोऱ्यातील संतनगरी पिरंगुट येथे काकड आरती सांगता निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे प्रतिवर्षाप्रमाणे या ही वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाची प्रारंभीची कीर्तन सेवा श्री दत्तात्रेय महाराज यांनी केली.या कीर्तनास ह.भ.प.बबन महाराज,ह.भ.प. सिद्धेश्वर महाराज आळंदी,ह.भ.प.केशव महाराज भेगडे,ह.भ.प. राजेंद्र गोडांबे ,ह.भ.प गणेश महाराज बोडके,तसेच मृदंगाचार्य ह.भ.प सारंग महाराज क्षीरसागर यांनी साथ  दिली.यावेळी प्राचार्य मनोहर भालके, समाजसेवक रामचंद्र देवकर,पिरंगुट येथील श्री चांगदेव पवळे, तसेच सामाजिक व सांस्कृतिक कार्यात अग्रभागी असलेले श्री ज्ञानेश्वर पवळे,श्री तुषार पवळे, पहिल्या दिवशी चे यजमान श्री नारायण सातव, श्री दशरथ मारोती पवळे,श्री कैलास पवळे ,श्री राजाभाऊ वाघ माऊली व पिरंगुट नगरीच्या पंचक्रोशीतील हजारो भाविकांची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार