आ. कैलास गोरंट्याल यांची भेट

 दीपक रणनवरे यांच्या उपोषणाला जालन्यात उत्स्फूर्त प्रतिसाद: आ. कैलास गोरंट्याल यांची भेट



...............

 जालना/नांदेड :दि.29 संतोष कुलकर्णी

          परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे तसेच इतर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने मुख्य समन्वयक तथा सामाजिक कार्यकर्ते  दीपक रणनवरे यांनी मंगळवारपासून जालना शहरातील गांधी चौकात उपोषण सुरू केले आहे. बुधवारी या उपोषणाचा दुसरा दिवस होता. जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी उपोषणस्थळी भेट देऊन दीपक रणनवरे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. दिवसभरामध्ये विविध पक्षाच्या नेत्यांनी वकील संघाने यांची भेट घेऊन ब्राह्मण संघर्ष समितीच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे.

 महाराष्ट्र राज्यातील समस्त ब्राह्मण समाज परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी करीत आहे. या मागणीसाठी समस्त ब्राह्मण समाजाने मोर्चे काढून आंदोलनही केले आहे. आंदोलन करूनही राज्य सरकारने परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा न केल्याने समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक दीपक रणनवरे यांनी मंगळवारपासून ( दि. २८) जालना शहरातील गांधी चौकात अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे.

उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी नांदेड शहरातील सकल ब्राह्मण समाजाच्या कार्यकर्त्यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शविला. अनिल डोईफोडे यांच्या नेतृत्वाखाली नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या शिक्षण, महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती सौ अपर्णा हृषिकेश नेरलकर, संतोष परळीकर, संतोष कुलकर्णी, हृषिकेश नेरलकर, डॉ मुकुंद मुळे, भूषण देशमुख,लक्ष्मीकांत पांडे, भालचंद्र लाटकर, शरद शुक्ला, दुर्गादास जोशी, सुदर्शन पालीमकर ,शैलेश नागापूरकर, राजीव रावलबाजे आदींनी जालना येथे जाऊन दीपक रणवरे यांच्या उपोषणाला पाठिंबा व्यक्त दिला आहे.

वंजारी सेवा संघाचे अध्यक्ष तथा जालना वकील संघाचे ॲड. संजय काळबांडे, ॲड भीमाशंकर देशमाने ,विक्रांत देशपांडे, आदिवासी महिला विकास मंडळाचे संस्थापक गोकुळ स्वामी, भाजपाच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष संध्याताई देठे , सौ जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, परशुराम सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश संघटक प्रकाश केदारे यांनी पाठिंबा दिला आहे.

नांदेड जिल्ह्यातील ब्राह्मण समाजाच्या वतीने दीपक रणनवरे यांच्या उपोषणाला पाठिंबा दाखविण्यासाठी नांदेड येथे वेगवेगळी आंदोलने करणार असल्याचे यावेळी संतोष परळीकर व सौ. अपर्णा नेरलकर यांनी सांगितले.

ब्राह्मण समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची मागणी रास्त असून शासन दरबारी ही मागणी मंजूर व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार