शीख धर्माचे संस्थापक धर्मगुरू गुरुनानक देवजी यांची आज जयंती

 शीख धर्माचे संस्थापक धर्मगुरू गुरुनानक देवजी यांची आज जयंती

परळी वैजनाथ रेल्वे स्थानक येथे  पालखीचे आगमन; भाटिया परिवाराकडून स्वागत


परळी (प्रतिनिधी)

शीख धर्माचे संस्थापक धर्मगुरू गुरुनानक देवजी यांची येत्या 27 नोव्हेंबर रोजी जयंती साजरी होत आहे. या निमित्ताने नांदेड ते बिदर या विशेष रेल्वे गाडीचे शासनाच्या वतीने दरवर्षी नियोजन करण्यात येते. रविवार, दि.26 ऑक्टोबर रोजी ही जयंती विशेष गाडी परळी वैजनाथ येथे आली असता भाटिया परिवार व मित्र परिवार यांच्या वतीने सर्वांसाठी लंगरची व्यवस्था करण्यात आली. याच वेळेस गाडीत असलेले सिख धर्माचे धर्मगुरू यांचा सत्कार करण्यात आला.

       सिख धर्माचे संस्थापक धर्मगुरू गुरुनानक देवजी यांच्या जयंती निमित्त दरवर्षी नांदेड ते बीदर असा पालखी सोहळा संपन्न होत असतो. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हा पारंपरिक सोहळा संपन्न होत असून रविवारी या पालखीचे परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन येथे आगमन झाले. पालखीचे आगमन होताच परळीतील भाटिया परिवार आणि मित्र परिवार यांच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर या विशेष रेल्वे गाडीतील सर्व प्रवासी भक्त बांधवांसाठी लंगरची व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे पालखीचे आगमन होण्यापूर्वी स्वागतासाठी थांबलेल्या भाटिया परिवारातील सदस्य आणि इतर सर्वांनीच स्टेशनची स्वच्छ्ता मोहीम राबवली. पालखी बिदरकडे जातांना जसे स्वागत करण्यात येते, त्याचप्रमाणे पालखी जयंती उत्सव संपन्न झाल्यानंतर परतीचा प्रवास करते. त्याही वेळेस परळी वैजनाथ रेल्वे स्थानक येथे अशाच स्वरूपाची व्यवस्था भाटिया परिवाराच्या वतीने करण्यात येते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार