पालकमंत्री धनंजय मुंडेंनी केला ह्रदय सत्कार

प.पु.आचार्य अमृताश्रम स्वामी महाराजांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार: पालकमंत्री धनंजय मुंडेंनी केला ह्रदय सत्कार




परळी वैजनाथ,प्रतिनिधी..

       बीड जिल्ह्याचे भूमिपूत्र व महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील थोर विभूती,अध्यात्मिक क्षेत्राचा सन्मान

नवगण राजुरी येथील प.पू.आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज (जोशीबाबा) यांना महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून किर्तन प्रबोधन या विभागातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला. त्याबद्दल परळी वैजनाथ येथे राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वामीजींचा ह्रदय सत्कार केला.

        प.पू.आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज (जोशीबाबा) परळी वैजनाथ येथे आयोजित कार्यक्रमासाठी आले होते.पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिर येथे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वामीजींची आवर्जून भेट घेत आशिर्वाद घेतले. त्याचबरोबर यावेळी  आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज  यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्काराबद्दल  ह्रदय सत्कार केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !