इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी उभारल्या जाणाऱ्या सभा मंडप उभारणीस जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विधिवत प्रारंभ

 ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी उभारल्या जाणाऱ्या सभा मंडप उभारणीस जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विधिवत प्रारंभ



 


बीड दि. 27, (जिमाका) : परळी वैद्यनाथ शहरात ‘शासन आपल्या दारी’ ची जय्यत तयारी सुरू असून आज कार्यक्रमासाठी उभारल्या जाणाऱ्या सभामंडप उभारणीस जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते विधिवत प्रारंभ झाला. यावेळी त्यांनी कामकाजाचा आढावा घेऊन पाहणी केली.


 


जनतेला शासकीय योजनांचा थेट लाभ मिळावा यासाठी राज्य शासनाच्यावतीने ‘शासन आपल्या दारी’  ही विशेष मोहीम राज्यभर राबविली जात आहे. बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथे ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम होणार असून आज जिल्हाधिकारी मुधोळ मुंडे यांनी प्रत्यक्ष कार्यक्रमास्थळी जाऊन पाहणी दौरा केला.


 


या ठिकाणी उभारण्यात  येणारा सभामंडप, स्टॉल्स,  लाभार्थी यांची व्यवस्था या सर्वांबद्दल सर्वंकष चौकशी केली.‌ कामाचा वेग वाढवण्याचे आदेश संबंधितांना दिले.


 


या पाहणी दौऱ्यामध्ये उपविभागीय दंडाधिकारी नम्रता चाटे, तहसीलदार वेंकटेश मुंडे, कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी, नायब तहसीलदार बी. एल. रुपनार यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या