परळीतील शासकीय विश्रामगृहाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण

 परळीतील शासकीय विश्रामगृहाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण





बीड दि. 27, (जिमाका) :  परळी वैद्यनाथ शहरात  शासकीय विश्रामगृहाचे लोकार्पण जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते आज झाले.

       बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील परळी वैद्यनाथ शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज चौक शेजारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने नव्याने उभारण्यात आलेल्या शासकीय  विश्रामगृहाचे आज जिल्हाधिकारी मुधोळ- मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण झाले.

            यावेळी उपविभागीय दंडाधिकारी नम्रता चाटे, अधीक्षक अभियंता बाबासाहेब थोरात, कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नायब तहसीलदार बी. एल. रूपनार, कंत्राटदार, अधिकारी ,कर्मचारी  उपस्थित होते. 

परळी वैद्यनाथ येथे ज्योतिर्लिंग असून  गणमान्य व्यक्तींचा सतत दौरा असतो. यासह थर्मल पॉवर, विविध शासकीय कार्यालय असल्यामुळे येथील एकाच शासकीय विश्रामगृहावर ताण पडत होता. नवीन शासकीय विश्रामगृह उभारल्यामुळे हा ताण आता कमी होणार असून अद्यावत सुविधांसह हे विश्रामगृह बांधण्यात आले आहे. 

या ठिकाणी येणाऱ्या विशेष अतिथींसाठी 2 विश्राम कक्ष आणि सामान्य 5 अशी एकूण सात विश्राम कक्ष आहेत.  यासोबतच 150 बैठक व्यवस्था असणारे सभागृहही येथे आहे. जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ-मुंडे यांनी नवीन विश्राम गृहाच्या उद्घाटनाप्रसंगी सर्वांचे अभिनंदन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार