परळीतील शासकीय विशेष अतिथी विश्रामगृहाचे सोमवारी धनंजय मुंडे यांच्या हस्ते व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार लोकार्पण


 परळीतील शासकीय विशेष अतिथी विश्रामगृहाचे सोमवारी धनंजय मुंडे यांच्या हस्ते व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार लोकार्पण



परळी वैद्यनाथ (दि. 26) - परळी वैद्यनाथ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक शेजारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या शासकीय विशेष अतिथी विश्रामगृहाचे सोमवारी सकाळी 11.00 वा. राज्याचे कृषिमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न होणार असुन, या कार्यक्रमास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रवींद्र चव्हाण व जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ - मुंडे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. 

परळी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी हे विशेष अतिथी विश्रामगृह उभारण्यात आले असून या ठिकाणी येणाऱ्या विशेष अतिथींसाठी विश्राम कक्षा सह विविध आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हे विश्रामगृह परळी वैद्यनाथ शहराची शोभा वाढवणारे ठरणार आहे.

या कार्यक्रमास राज्यसभा सदस्या खा.सौ.राजनीताई पाटील, खा.डॉ.प्रीतमताई मुंडे, आ.सुरेश धस, आ.विक्रम काळे, आ.सतिश चव्हाण, आ.ऍड.लक्ष्मण पवार, आ.प्रकाशदादा सोळंके, आ.बाळासाहेब आजबे, आ.संदीप क्षीरसागर, आ.श्रीमती नमिताताई मुंदडा आदी मान्यवर निमंत्रित आहेत. 

या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन सार्वजनिक बांधकाम छत्रपती संभाजीनगर विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कातकडे, अधीक्षक अभियंता बाबासाहेब थोरात, कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी, उपविभागीय अभियंता संजय मुंडे यांनी विभागाच्या वतीने केले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !