डॉ. राजेश इंगोले,प्रमोद आडसुळे, रानबा गायकवाड निर्मित 'राधा' लघुपटाचा गौरव

 डॉ.सिद्धार्थ तायडे दिग्दर्शित 'राधा लघुपट' इंडियन स्क्रीन प्रोजेक्ट कोलकाता   महोत्सवात सन्मानित



डॉ. राजेश इंगोले,प्रमोद आडसुळे, रानबा गायकवाड निर्मित 'राधा' लघुपटाचा गौरव


 परळी प्रतिनिधी    पश्चिम बंगाल येथील सिनेरत्न तथा भारतीय समांतर  सिनेमाचे जनक सत्यजीत रे आणि मृणाल सेन यांच्या भूमीत अर्थातच कोलकाता येथे इंडियन स्क्रीन प्रोजेक्ट आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव नुकताच संपन्न झाला.पश्चिम बंगाल मधील कोलकाता येथील हावडा सरत सदन येथे संपन्न झालेल्या इंडिया स्क्रीन प्रोजेक्ट या आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात प्रख्यात पत्रकार प्रमोद अडसुळे लिखित,प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ.राजेश इंगोले निर्मित, जेष्ठ साहित्यिक पटकथाकार रानबा गायकवाड संवादित आणि डॉ. सिद्धार्थ तायडे दिग्दर्शित 'राधा' या लघुपटास सर्वोत्कृष्ट लघुपट सन्मान प्राप्त झाला आहे. 

     सिने-नाटय अभिनेता-लेखक दिग्दर्शक डॉ. सिद्धार्थ तायडे यांनी दिग्दर्शित केलेल्या "राधा" या   लघुचित्रपटास इंडियन स्क्रीन प्रोजेक्ट कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (ISP 2023) 

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट  पटकथा, सर्वोत्कृष्ट लघुचित्रपट, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर असे पाच सन्मान  प्राप्त झाले आहेत.बेटी बचाव,बेटी पढाव हा संदेश या लघुपटातून देण्यात आला आहे.

     जगभरातून आलेल्या विविध भाषांमधील लघुचित्रपटातून जे लघुचित्रपट परीक्षकांनी निवडले त्यात "राधा" ला स्थान मिळालं ही आनंदाची बाब आहे. देशभरातून विविध भाषांमधील लघुचित्रपटांनी या महोत्सवात हजेरी लावली होती. या चित्रपट महोत्सवात राधा या लघुपटस आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाल्याबद्दल राधा लघुपटातील सर्व कलावंताचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. राधा या लघुपटाचे संवाद लेखन रानबा गायकवाड यांनी केले असून कथा व छायांकन हे प्रमोद आडसुळे तर  संकलन शरद शिंदे यांनी केले आहे. या आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त लघुपटात प्रख्यात मनोविकार तज्ञ तथा अष्टपैलू अभिनेता डॉ. राजेश इंगोले,बाल कलावंत वैष्णवी नागरगोजे,ओम गिरी, मधुरा आडसुळे ,

 माजी केंद्रप्रमुख नागनाथ नाना बडे,पटकथाकार रानबा गायकवाड, दत्ताभाऊ वालेकर ,कवी बा.सो. कांबळे, विकास वाघमारे ,पूजा कांबळे,नवनाथ दाणे, आदींनी भूमिका साकारल्या आहेत.

   या सन्मानाबद्दल ग्लोबल आडगाव फेम डॉ. अनिलकुमार साळवे, मनोज कदम, अमृत मराठे तसेच

माजी आमदार शिवाजीराव चोथे, डॉ. संभाजी चोथे, विनायक चोथे, प्राचार्य डॉ. आर. के. परदेशी, उप प्राचार्य प्रा. प्रमोद जायभाये,ज्येष्ठ नेते भास्कर नाना रोडे,चंदूलाल बियाणी, राजकिशोर मोदी, बाजीराव धर्माधिकारी, डॉ.विनोद जगतकर, उपजिल्हाधिकारी महादेव किरवले,प्रा. दासू वाघमारे,प्रोफे. डॉ.संजय जाधव,प्रा.विलास रोडे,अजयकुमार गंडले,दत्ताभाऊ सावंत,विधिज्ञ दिलीप उजगरे, अनंत इंगळे ,भगवान जगताप,विष्णू तायडे, राहुल तायडे,विजय जाधव,ब्रिजेश जाधव, इंजि. अजय जगताप, शुभम जगताप, प्राचार्य डॉ.दळवे,डॉ. बबन मस्के,संतोष पोटभरे,प्राचार्य सी. व्ही. गायकवाड,बालासाहेब इंगळे,प्राचार्य डॉ. रमेश इंगोले, प्रा. शंकर सिनगारे,प्राचार्य अरुण पवार,डॉ. राजकुमार यल्लावाड,अनंत मुंडे,केशव कुकडे, प्रा. संजय आघाव, दिवाकर जोशी, सुनील फुलारी,सिद्धेश्वर इंगोले,लहू कांबळे,प्रा. बी. एम. खरात, मोहन व्हावळे,रवी जोशी,भगवान साकसमुद्रे,संभाजी मुंडे,विकास वाघमारे,संतोष बारटक्के,नवनाथ दाणे,ब्रिजेश इंगळे, हरिदास घुंगसेआनंद तूपसमुद्रे यांचेसह सिने-नाटय   क्षेत्रातील मान्यवरांनी टीम राधाचे अभिनंदन  केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार