प्रा.टि.पी.मुंडेंची परळीत पत्रकार परिषद : मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

आवकाळी पावसाने उसतोड कामगारांचे प्रचंड नुकसान; प्रत्येकी 25 हजारांची अर्थिक मदत द्या-प्रा.टी.पी.मुंडे 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

      दोन-चार दिवसापासून जी गारपीट आणि अवकाळी पाऊस चालू आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्र सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये सर्वात मोठे नुकसान ऊसतोड कामगारांचे झाले आहे. जो ऊसतोड कामगार महाराष्ट्रामध्ये गेला आहे. या गारपिटीमुळे अवकाळी पावसामुळे त्यांच्या सोबत असलेले उपजीविकेच्या सामान खराब झाले आहे. ऊसतोड कामगार व त्यांची मुले बाळे आजारी पडली आहेत.आता त्यांना त्यांची उपजीविका भागवण्यासाठी खायला अन्न नाही त्यामुळे त्यांची उपासमार होत आहे व आजारी पडलेल्यांना दवाखान्यात जाण्यासाठी पैसा नाही म्हणून सर्व साखर कारखान्यांच्या अध्यक्षांनी ताबडतोब दोन कोयत्याला (जोडीला) कारखान्यानतर्फे २५ हजाराची  आर्थिक मदत करावी अशी मागणी प्रा.टि.पी.मुंडे यांनी केली आहे.

            राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी  संबंधित  सर्व साखर कारखान्यांना तातडीने आदेश द्यावा. अनेक कारखान्यांवरून ऊसतोड कामगारांचे फोन येत आहेत. उसतोड कामगार संकटात आहे.त्यांना काहीतरी मदत करणे आवश्यक आहे. आपण परळीच्या जवळ असलेल्या मांडेखेल या गावी सायखेडा साखर कारखाना (टी- 20 शुगर) व गंगाखेड शुगर साखर कारखाना या दोन्ही साखर कारखान्यांच्या ऊसतोड कामगारांच्या भेटी घेतल्या. त्यांचे दुःख ,वेदना, किंकाळ्या ऐकल्या आणि त्यांचे दुःख प्रत्यक्ष जाणून घेतले आहे.

         महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री , साखर कारखान्यांचे अध्यक्ष (चेअरमन), साखर महासंघाचे अध्यक्ष, व साखर आयुक्त यांना निवेदन देऊन या उसतोड कामगारांना तातडीने मदत करावी अशी मागणी केली असल्याचे प्रा.टि.पी.मुंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !