पोस्ट्स

MB NEWS:सामाजिक बाधिलकी जपणारे डाॅ.रविंद्र जगतकर यांना नाथरा येथे समाजभुषण पुरस्काराने सन्मानित

इमेज
  सामाजिक बाधिलकी जपणारे डाॅ.रविंद्र जगतकर यांना नाथरा येथे समाजभुषण पुरस्काराने सन्मानित नाथरा येथील श्रीनाथ मानव सेवा मंडळच्या वतीने ६ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात मान्यरांच्या हस्ते वितरण मित्र परिवाराकडून डाॅ.रविंद्र जगतकर यांचे अभिनंदन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  ठाणे व रायगड जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक तथा परळी शहरातील जगतकर गल्ली येथील भूमिपुत्र डाॅ.रविंद्र प्रकाश जगतकर यांना श्रीनाथ मानव सेवा मंडळ गेल्या काही वर्षापासून संस्थेचे अध्यक्ष डॉ.एकनाथ मुंडे यांच्या मुख्य संयोजनातून ६ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या वतीने दिला जाणारा  राज्यस्तरीय "समाजभूषण" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून मान्यवर, मित्रपरिवार व नातेवाईकांकडून स्वागत व अभिनंदन होत आहे.          श्रीनाथ मानव सेवा मंडळ नाथ्रा आयोजित सहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वास त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरित करून त्यांच्या कार्यास बळ देण्याच्या विधायक उद्देशाने कर्तृत्ववा

MB NEWS:भावसार समाज दिनदर्शिका प्रकाशन

इमेज
  भावसार समाज दिनदर्शिका प्रकाशन  भावसार समाज व भावसार युवा सेवाभावी संस्था परळी वैजनाथ पदाधिकारी सदस्य व समाज बांधव यांच्या हस्ते दिनदर्शिका 2023 चे प्रकाशन सोहळा संपन्न झाला.           आज दिनांक 08 रविवार रोजी भावसार युवा सेवाभावी संस्थेच्या वार्षिक उपक्रमांपैकी एक दिनदर्शिका प्रकाशन सोहळा श्री हिंगलाज माता देवीची आरती करून कुलस्वामिनी ज्वेलर्स येथे करण्यात आला.          यावेळी समाजातील ज्येष्ठ मंडळी व युवक यांची उपस्थिती होती.          भावसार युवा सेवाभावी संस्था अशा उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असते.       

MB NEWS:समाजातील वाढती हुंडाप्रथा चिंतेची बाब

इमेज
  संस्कारक्षम अन्  दोषमुक्त समाज निर्मितीसाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं - पंकजाताई मुंडे समाजातील  वाढती हुंडाप्रथा चिंतेची बाब पंकजाताई मुंडेंच्या हस्ते नाशकात विविध क्षेत्रातील वंजारी युवकांचा थाटात सन्मान नाशिक ।दिनांक ०८। जो समाज एकेकाळी वंचित, पिडित होता, तो आज शिक्षणामुळे सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे, ही आपल्यासाठी भूषणावह बाब आहे. समाजाला आणखी पुढे नेण्यासाठी प्रत्येकांनी एकमेकांना मदतीची भावना अंगी बाळगण्याची आवश्यकता आहे. चांगल्या संस्काराबरोबरच दोषमुक्त समाज निर्मिती ही काळाची गरज आहे, त्यासाठी समाज धुरिणांनी एकत्रित  येऊन काम करावं असं आवाहन  भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज येथे केलं. समाजातील वाढत्या हुंडाप्रथेवर चिंता व्यक्त करत त्यांनी ही प्रथा बंद व्हावी यासाठी आता तरूणांनीच पुढं यावं असं म्हटलं आहे.    असोसिएशन ऑफ वी प्रोफेशनल यांच्या वतीने पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज  वंजारी युवा सन्मान सोहळा मोठया थाटात पार पडला त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष

MB NEWS:दीनदयाळ बँकेच्या युगपुरूष स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे 10 ते 12 जानेवारी दरम्यान आयोजन

इमेज
  दीनदयाळ बँकेच्या युगपुरूष स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे 10 ते 12 जानेवारी दरम्यान आयोजन – बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड.मकरंद पत्की व उपाध्यक्ष अ‍ॅड.राजेश्‍वर देशमुख यांची माहिती अंबाजोगाई (प्रतिनिधी) विश्‍वास, विकास आणि विनम्रता या त्रिसुत्रीने आर्थिक क्षेत्रात कार्यरत दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 10 जानेवारी ते 12 जानेवारी 2023 या कालावधीत दररोज सायंकाळी 6.30 वाजता युगपुरूष स्वामी विवेकानंद यांच्या 160 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी अंबाजोगाईकरांनी व बँकेच्या सर्व सभासदांनी नियोजित वेळेत उपस्थित राहून व्याख्यानमालेचा सहकुटूंब, सहपरिवार लाभ घ्यावा असे नम्र आवाहन बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड.मकरंद पत्की व उपाध्यक्ष अ‍ॅड.राजेश्‍वर देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. आर्थिक क्षेत्रात कार्य करताना सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून समाजाचे आपण काही देणे लागतो. या जाणिवेने अंबाजोगाईकरांना मागील 20 वर्षांपासून व्याख्यानमालेच्या माध्यमातून वैचारिक मेजवानी देण्याचे काम दीनदयाळ नागरी सहकारी बँक अव्याहतपणे करीत आहे. या उपक्रमाचे हे 21 वे

MB NEWS:मागेपुढे न पाहता गाडी रिव्हर्स घेताना मॉर्निंग वॉक करणाऱ्या वृद्धाला चिरडले !

इमेज
  मागेपुढे न पाहता गाडी रिव्हर्स घेताना मॉर्निंग वॉक करणाऱ्या वृद्धाला चिरडले ! परळी वैजनाथ, प्रतिनिधी....            चारचाकी वाहन वेगाने मागे घेत असताना सकाळी फिरण्यास निघालेल्या व्यक्तीचा वाहनाखाली येऊन मृत्यू झाल्याची घटना रविवार दि 8 रोजी सकाळी घडली.            या बाबतीत मिळालेल्या प्राथमिक माहीतीनुसार परळी शहरातील शिवाजी नगर भागातील रहिवासी असलेले दादाराव गोविंदराव मस्के ( वय 70 ) हे रविवार दि 8 रोजी सकाळी मर्निग वॉक करिता घराबाहेर पडले असता ईटके कॉर्नर चौकात भरधाव वेगात चारचाकी गाडी मागे घेत असताना गाडीचा व त्यांचा अपघात झाला.या अपघातात ते गंभीर जखमी  झाले. दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच ते मयत झाले. परळी उपजिल्हा रुग्णालयात हिव-ताप मलेरिया विभागातील कर्मचारी रणजित मस्के याचे ते वडील होते.

MB NEWS:गो मतेचे रक्षण म्हणजे संस्कृतीचे रक्षण- साध्वी श्रेया भारतीजी.

इमेज
 गो मतेचे रक्षण म्हणजे संस्कृतीचे रक्षण- साध्वी श्रेया भारतीजी. अंबाजोगाई/लातुर _ गुरुदेव श्री आशुतोष महाराजजी यांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली दिव्य ज्योति जागृति संस्थानच्या वतीने ५ ते ११ जानेवारी २०२३ दरम्यान श्री मारवाडी राजस्थान शाळेच्या पाठीमागील ग्राउंड मध्ये सात दिवसीय भव्य श्री राम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. कथेच्या तिसऱ्या दिवशी, श्री आशुतोष महाराज जींच्या शिष्या श्रेया भारती यांनी सीता स्वयंवराच्या संदर्भात सांगितले की, भगवान श्री रामजी दैवी लीला करत असताना गुरुकुलातून शिक्षण घेऊन अयोध्येला कसे परतले. त्यानंतर विश्वामित्रजी भगवान श्री राम आणि लक्ष्मण यांची राजा दशरथ यांच्याकडे मागणी करतात. श्री राम त्यांच्या कार्याची पार्श्वभूमी तयार करताना वाटेत ताडकासुर चा वध करतात. पुढे जात असताना गौतम ऋषींची पत्नी अहिल्येचा उद्धार करून यज्ञाचे रक्षण करतात. त्यानंतर ते गुरु विश्वामित्रांसहित जनकपुरीत प्रवेश करतात आणि भगवान शिवाचे धनुष्य तोडून जानकीशी लग्न करतात. लग्नसोहळ्यात माता गोदान करतात. साध्वीजी म्हणाल्या की गाय ही आपल्या संस्कृतीचा आधार आहे आणि समाजाचा कणा आहे तिचे संरक्षण करणे आवश्

MB NEWS:पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध; शिंदे गटात उत्सुकता; भाजपचा मात्र सावध पवित्रा

इमेज
  पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध; शिंदे गटात उत्सुकता; भाजपचा मात्र सावध पवित्रा        मुंबई  :  राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात घटनापीठासमोरील सुनावणी या महिन्यात होणार असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहू लागले आहेत. भारतीय जनता पक्षाने मात्र सावध पवित्रा घेत मंत्रिमंडळ विस्तारासाठी चर्चेत असलेल्या कुठल्याही तारखेवर भाष्य करणे टाळलेले दिसते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर घटनापीठासमोर, तर शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर याच महिन्यात होणारी सुनावणी आपल्याच बाजूने होईल, असा दावा शिंदे गटाकडून आणि शिवसेनेकडूनही केला जात आहे. या सुनावणीच्या भरवशावरच शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, असे भाकीत शनिवारी नाशिकमध्ये पुन्हा केले. हे सरकार व्हेंटिलेटरवर असून ते काढले की हे राम झालेच म्हणून समजा, असे ते म्हणाले. त्यास उत्तर देताना शिंदे गटाचे आमदार आणि मंत्रिपदाचे दावेदार संजय शिरसाट यांनी राऊत यांचे मानस

MB NEWS:लांडग्याचा कळपावर हल्लाबोल:6 शेळयांचा मृत्यू

इमेज
  लांडग्याचा कळपावर  हल्लाबोल:6 शेळयांचा मृत्यू परळी तालुक्यातील सरफराजपूर येथे लांडग्यांनी हल्ला केला असून यामध्ये शेळी पालन करणाऱ्याच्या 6 शेळ्या लांडग्यांनी फस्त केल्या आहेत.याबाबत नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांना माहिती कळताच त्यांनी पोलीस व महसूल प्रशासनाला याबाबत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. परळी तालुक्यातील सरफराजपूर हा बालाघाटाच्या डोंगर पट्ट्यात येणारा भाग असून या भागात अनेक वन्य प्राण्यांचे अस्तित्व आहे.मोर,हरीण यासोबत अनेक वन्य प्राणी या भागात दिसून येतात.या मध्ये शनिवार दि 7 रोजी या परिसरात असलेल्या सरफराजपूर येथील भरत रामभाऊ घाडगे  या  पशुपालकाच्या शेळयावर लांडग्यानी शनिवार रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान हल्ला केला.या मध्ये त्यांच्या 6 शेळ्या लांडग्यांनी फस्त केल्या आहेत. या घडणेची माहिती समजताच महसूल विभागाचे नायब तहसीलदार बाबूराव रुपनर यांनी वनविभाग, पोलील यांना पंचनामा करण्यासाठी कळवले आहे.

MB NEWS:अर्थो रक्षति रक्षित: किं घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने..

इमेज
  अर्थो रक्षति रक्षित: किं घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने.. डॉ क्टरांना रूग्णांची नाडी तपासून निदान करता येते, हा दृढ विश्वास अनेकाबाबत आजही कायम आहे. आरोग्यदायी समाजनिर्मितीत डॉक्टरांचे योगदान मोलाचे ठरते. त्या दृष्टीने विचार करायचा तर आरोग्य साक्षरते बरोबरच अर्थ साक्षरता देखील महत्वाची ठरत आहे. हाच वसा डॉ.दिगंबर जनार्धन दंडे यांनी घेतला. रूग्णांना उपचाराद्वारे दिलासा देतानाच त्यांच्या आर्थिक गरजांच्या पुर्ततेसाठी प्रयत्न करण्याचे मनोमन ठरवले आणि यातूनच डॉ.दंडे यांचा बँकींग क्षेत्रात प्रवेश झाला. दीनदयाळ नागरी सहकारी बँक म.अंबाजोगाई या बँकेत संचालक ते अध्यक्ष हा डॉक्टरांचा प्रवास लक्षात घेण्याजोगा आहे. संघाच्या संस्कारातून पुढे आलेल्या डॉ.दिगंबर दंडे यांनी कायम समाजाच्या सर्वांगिण हिताचा विचार केला. बँकेच्या निरंतर प्रगतीबरोबरच समाजातील विविध घटक या बँकेशी कसे जोडले जातील यावर भर दिला. डॉ.दंडे यांच्या या कार्यावर टाकलेला हा दृष्टीक्षेप... ‘आरोग्यदायी जीवन’ ही मोठी देणगी समजली जाते. समाज हा व्यक्ती-व्यक्तिंचा असतो. त्यादृष्टीने विचार करायचा तर व्यक्तीगत आरोग्य उत्तम राखल्यास निरोगी समाज

MB NEWS:स्वामी समर्थ पतसंस्था ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरत आहे - पी एस घाडगे

इमेज
  स्वामी समर्थ पतसंस्था ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरत आहे - पी एस घाडगे परळी वै.ता.७ प्रतिनिधी       पिग्मी एजंटानी स्थापन केलेली श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्था ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरत आहे. ही पतसंस्था सामान्यांचा आधार व्हावी असे मत जेष्ठ नेते तथा सहकार क्षेत्राचे अभ्यासक कॉ पी एस घाडगे यांनी व्यक्त केले.       श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने काढलेल्या दिनदर्शीका २०२३ चे प्रकाशन जेष्ठ नेते पी एस घाडगे व पांडुरंग राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. पतसंस्थेचे अध्यक्ष पवनकुमार जैस्वाल यांनी पी एस घाडगे सरांचा सत्कार केला. यावेळी जैस्वाल यांनी पतसंस्थेचा व्यवहार दिवसेंदिवस वाढत असल्याचे सांगीतले. यावेळी बोलताना घाडगे सरांनी सांगीतले की या पतसंस्थेचे उद्घघाटन १८ वर्षापुर्वी माझ्याच हस्ते झाले होते. आकर्षकपणे काढण्यात आलेल्या दिनदर्शीकेचे प्रकाशन करतांना मनस्वी आनंद होत आहे. श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्था परळी शहरातील सामान्यांचा आधार बनत चाललीय ही बाब कोतुकास्पद असल्याचे मत घाडगे सरांनी व्यक्त केले. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष पवनकुमार जैस्वाल, सच

MB NEWS:राष्ट्रीय संत भगवान बाबा यांची पुण्यतिथी साजरी

इमेज
  किर्तन मनोरंजनाचे नाही तर ते समाज परिवर्तनाचे साधन आहे - ह.भ.प.पांडुरंग महाराज घुले  शक्तीकुंज वसाहत येथे भव्य किर्तन, महाप्रसाद   रथामधून मिरवणूकीने  ऐश्वर्य संपन्न राष्ट्रीय संत भगवान बाबा यांची पुण्यतिथी  साजरी   परळी वैद्यनाथ दि. ७(प्रतिनिधी)किर्तन हे मनोरंजनाचे नाही तर ते समाज परिवर्तन चे शक्तीशाली साधन असून या साधनाकडे मनोरंज म्हणून पाहणे अतिशय चूकीचे असून किर्तनकारांनी सुध्दा हे पातक करू नये. तसेच संताची पुजा न करता केवळ देवाची पूजा करणे सुध्दा अधर्मच ठरतो असे प्रतिपादन हरी भक्ती परायण गुरूवर्य पांडुरंग महाराज घुले यांनी परळी वैद्यनाथ,शक्तीकुंज वसाहत  येथे आयोजीत ऐश्वर्य संपन्न राष्ट्रीय संत भगवान यांच्या पुण्यतिथी सोहळ्या प्रसंगी केले.      शनिवार दि. ७ जानेवारी रोजी परळी वैद्यनाथ शहरातील शक्तीकुंज वसाहत या ठिकाणी ऐश्वर्य संपन्न राष्ट्रीय संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य किर्तन  सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.  जगद्गुरु संत तुकाराम गाथा मंदिर समितीचे अध्यक्ष ह.भ.प.पांडुरंग महाराज घुले यांनी संत तुकाराम महाराज यांच्या संतसमागम एखादिया परी । राहावें त्याचे द्वारी

MB NEWS:भक्ती -कर्म -ज्ञान मार्गाचा त्रिवेणी समन्वय : संत भगवानबाबा

इमेज
  भक्ती -कर्म -ज्ञान मार्गाचा त्रिवेणी समन्वय : संत भगवानबाबा भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्तिमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा त्रिवेणी समन्वय त्यांनी साधला होता.आपल्या कीर्तनांतून ते जातिभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करीत. प्रबोधनकार्यासाठी त्यांनी मराठवाडा, विदर्भ,तेलंगना,आंध्रप्रदेश,कर्नाटकातील काही भाग व पश्‍चिम महाराष्ट्रासह उभा महाराष्ट्र पिंजून काढला. विठूनामाचा प्रचार करतानाच त्यांनी समता, बंधुता, एकता, मानवता यांसारख्या आधुनिक विचारांचा आयुष्यभर प्रचार केला. त्यामुळेच वारकरी धर्माला आधुनिक रूप देणारे संत म्हणून त्यांना ओळखले जाते.  बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यांतल्या सुपे घाट सावरगाव येथे श्रावण वद्य पाच शके १८१८ (२९ जुलै, इ.स. १८९६), सोमवार रोजी सूर्योदयाच्या समयी भगवानबाबांचा जन्म झाला. मुलाचे नाव 'आबा' किंवा 'आबाजी' ठेवण्यात आले. त्यामुळे भगवानबाबांचे पूर्ण नाव आबाजी तुबाजी सानप. ते कौतिकाबाई आणि तुबाजीराव यांचे पाचवे अपत्

MB NEWS:अनुकंपाअंतर्गत नोकरीस घेण्यास टाळाटाळ; प्रजासत्ताक दिनी प्राणांतिक उपोषणाचा इशारा

इमेज
  अनुकंपाअंतर्गत नोकरीस घेण्यास टाळाटाळ; प्रजासत्ताक दिनी प्राणांतिक उपोषणाचा इशारा परळी वैजनाथ ता.०६ ...              शहरातील वैद्यनाथ माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक प्रल्हाद शिवाजी जोगदंड सेवेत असताना कार्यालयीन कामाच्या दिवशी ४ आँगस्ट २०१४ ला निधन झाले असून अनुकंपा योजनेअंतर्गत प्रयोगशाळा सहाय्यक किंवा कनिष्ठ लिपिक नियुक्ती देण्यासाठी मुलगी अंजली प्रल्हाद जोगदंड यांनी विनंती अर्ज केला होता. मात्र तो अद्यापही यावर काही कारवाई झाली नाही. यामुळे प्रजासत्ताकदिनी प्राणांतिक उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.            अंजली प्रल्हाद जोगदंड यांनी वडीलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर नौकरी मिळावी यासाठी शिक्षणाधिकारी यांच्याकडे अर्ज केला मात्र शिक्षणाधिकारी यांच्याकडून या अर्जाबाबत कोणतेही कार्यवाही केली जात नाही किंबहुना कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. घरामध्ये कमावती व्यक्ती नसल्यामुळे प्रल्हाद शिवाजीराव जोगदंड यांच्या कुटुंबाची त्यांच्या जाण्याने उपासमारीची वेळ आली आहे. प्रल्हाद शिवाजीराव जोगदंड यांची मुलगी अंजली प्रलाद जोगदंड बारावी उत्तीर्ण असूनही अनुकंपा अंतर्गत नोकरी पासून तिला जाणू

MB NEWS:_सम्येद शिखरजी तीर्थस्थान जैन धर्मीयांच्या आस्था आणि श्रध्देचे प्रतिक

इमेज
  जैन धर्मीयांच्या मागणीचा सकारात्मक विचार होणे आवश्यक - पंकजाताई मुंडे यांची मागणी _सम्येद शिखरजी तीर्थस्थान जैन धर्मीयांच्या आस्था आणि श्रध्देचे प्रतिक मुंबई  । दिनांक ०६। सम्येद शिखरजी तीर्थस्थान जैन धर्मीयांच्या आस्था आणि श्रध्देचे प्रतिक असल्याने या तीर्थस्थाना संदर्भात समस्त जैन धर्मीयांनी केलेल्या मागणीचा सकारात्मक विचार होणे आवश्यक आहे अशी अपेक्षा  भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.   सम्येद शिखरजी हे जैन धर्मीयांचे पवित्र तीर्थस्थळ आहे. झारखंड सरकारने या तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळाचा दर्जा जाहीर केला आहे. या निर्णयाबद्दल देशातील समस्त जैन समाजाने तीव्र नाराजी व्यक्त करत  तीर्थक्षेत्राला दिलेला पर्यटन स्थळाचा दर्जा रद्द करावा अशी मागणी केली आहे.   यासंदर्भात पंकजाताई मुंडे यांनी ट्विट केले आहे. " सम्येद शिखरजी हे जैन धर्मीयांच्या आस्था आणि श्रध्देचे प्रतिक आहे. पर्यटन स्थळाचा दर्जा इथल्या पवित्र तीर्थस्थानाला बाधा आणणारे आहे, त्यामुळे जैन समाजाच्या मागणीचा सकारात्मक विचार होणे आवश्यक आहे" अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. •••• 

MB NEWS:शिवसैनिकांच्या वतीने ममता दिन उत्साह साजरा

इमेज
  शिवसैनिकांच्या वतीने ममता दिन उत्साह  साजरा परळी वै.(प्रतिनिधी)  स्व. मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसैनिक ममता दिन म्हणुन साजरा करतात परळी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने स्व.माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन शिवसेना उप जिल्हाप्रमुख अभयकुमार ठक्कर, युवासेना बीड जिल्हा समन्वयक प्रा.अतुल दुबे,माजी शिवसेना माजी उप शहर प्रमुख सतिष जगताप यांच्या हस्ते करून ममता दिन साजरा करण्यात आला. 6 जानेवारी हा दिवस स्व. मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असुन शिवसैनिक हा दिवस ममता दिन म्हणुन मोठ्या साजरा करतात याच अनुषंगाने परळी वैजनाथ येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने शिवाजी नगर या ठिकाण स्व.माँ साहेब मीनाताई ठाकरे  यांच्या प्रतिमेचे धुप,दिप व पुष्प हार अर्पण करून पूजन शिवसेना उप जिल्हाप्रमुख अभयकुमार ठक्कर, युवासेना बीड जिल्हा समन्वयक प्रा.अतुल दुबे,माजी शिवसेना माजी उप शहर प्रमुख सतिष जगताप यांच्या हस्ते करण्यात आले . या वेळी शिवसेना माजी शहर संघटक संजय कुकडे,शिवसेना उप शहर प्रमुख किंशन बुंदेले,छत्रपती शिवाजी महाराज चौक विभाग प्रमुख संजय सोमा

MB NEWS:जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार धरणे आंदोलन

इमेज
  ■पीक विमा व इतर प्रश्नांना घेऊन किसान सभा मैदानात ●जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार धरणे आंदोलन परळी / प्रतिनिधी बीड जिल्हाभरातील अनेक शेतकऱ्यांना २०२२ अतिवृष्टी अनुदान अद्याप वाटप झाला नाही व २०२२खरीप विमा वाटपात देखील ताफवती व पारदर्शकता नाही. ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान, पीक विमा मिळाला त्यांची बँक खाती होल्ड करणे.पीक विमा, अतिवृष्टी अनुदान, कृषी वीज पुरवठा व शेत मालास हमीभाव या प्रश्नावर किसान सभा बीड जिल्हा कमिटीच्या वतीने सोमवार दि ९ जानेवारी रोजी जिल्हा कचेरीवर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती किसान सभेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. शासन व पीक विमा कंपनीने बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांची चेष्टा केली असून जानेवारी महिना सुरू असून अद्याप देखील अनेक शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान मिळलेले नाही.कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या उद्योगपतींच्या खात्याला होल्ड न लावता शेतकऱ्यांच्या अनुदान , पीक विमा मिळत असलेल्या खात्याला शासन,विमा कंपनी व बँका होल्ड करीत आहे यामधून शासनाची शेतकरी विरोधी भूमिका स्पष्ट होत आहे.कृषी पंपाला योग्य दाबाने सलग 8 तास वीज पुरवठा देण्यात यावा.सोय

MB NEWS:खाजगी इसम व वीजवितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

इमेज
  खाजगी इसम व वीजवितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात परळी वैजनाथ: दि. 06 : तक्रारदाराच्या सासऱ्याचे जळालेले मीटर बदलून देण्यासाठी महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञसाठी खाजगी इसमाने शुक्रवारी (दि. 6 ) दुपारी 20 हजाराची लाच स्वीकारली. या प्रकरणी दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल ज्ञानोबा नागरगोजे (वय 29, नोकरी, वरिष्ठ तंत्रज्ञ, शहर पथक क्र 1, म.रा.वि.नि. कंपनी. परळी) व खाजगी इसम वृक्षराज लक्ष्मण काळे (वय 35 रा. टोकवाडी, ता. परळी) अशी लाचखोरांची नावे आहेत. तक्रारदार यांचे सासऱ्याचे नावे असलेले घरगुती विद्युत मीटर जळल्याने सदरचे मीटर बदलून नवीन मीटर बसवून दिल्याचा मोबदला, व यापुढे जास्त बिल येऊ न देण्यासाठी नागरगोजे याने लाचेची मागणी करून पंचासमक्ष लाच रक्कम स्वीकारून लाच रक्कम खाजगी व्यक्तीकडे दिली. ही रक्कम खाजगी व्यक्तीने स्वतः पंच साक्षीदार समक्ष स्वीकारली असता लाच रकमेसह रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पो.नि. श्री. रविंद्र परदेशी, पोलीस अंमलदार भारत गारदे,  अविनाश गवळी, श्रीराम गिराम,चालक-गणेश म्हेत्रे ला.प्र.वि, बीड यांच्या

MB NEWS:कोष्टी समाज परळीच्या वतीने आयोजन; सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रम

इमेज
  टाळ, मृदंगासह ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात श्री रामलिंग चौंडेश्वरी पारायण सोहळ्याची भक्तीपूर्ण वातावरणात सांगता; भाविकांची लक्षणिय उपस्थिती कोष्टी समाज परळीच्या वतीने आयोजन; सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रम परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  परळी शहरातील कोष्टी समाज बांधवांच्या वतीने श्री रामलिंग चौंडेश्वरी देवांग पुराण पारायण सोहळ्याची आज शुक्रवार दिनांक 6 जानेवारी रोजी ज्ञानोबा, तुकारामच्या जय घोषात भक्तीपूर्ण वातावरणात सांगता झाली.दि.30 डिसेंबर पासून सात दिवस चाललेल्या विविध धार्मीक कार्यक्रमास परळी शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांची मोठी उपस्थिती लाभली. परळीतील गुरूकृपानगर येथील श्री हरेगावकर यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या या चौंडेश्वरी देवांग पुराण पारायण सोहळ्याचे दि.30 डिसेंबर ते 6 जानेवारी दरम्यान  आयोजन करण्यात आले होतेे. आज सकाळी 11 वा परळी शहराच्या विविध मार्गावरून श्री चौंडेशवरी देवीच्या प्रतिमेची सवादय शोभायात्रा काढणयात आली. यात भाविक भक्त मोठया संखयेने सहभागी झाले होते. टाळ, मृदंगासह ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात श्री रामलिंग चौंडेश्वरी पारायण सोहळ्याची भक्तीपूर्ण वातावरणात ही

MB NEWS:श्रावणमास तपोनुष्ठान समिती परळीचा उपक्रम

इमेज
  राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व शाकांभरी महोत्सवानिमित्त श्री शनि मंदिरात खिचडी वाटप श्रावणमास तपोनुष्ठान समिती परळीचा उपक्रम परळी वैजनाथ / प्रतिनिधी वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक पोर्णिमेनिमित्त श्रावणमास तपोनुष्ठान समिती परळी वैजनाथच्या वतीने खिचडी प्रसादाचे आयोजन भाविक-भक्तांसाठी करण्यात येते तसेच शुक्रवारी आलेल्या शाकांभरी निमित्त दुहेरी योग साधत भाविकांना खिचडी प्रसाद वाटप करण्यात आले. शांकाभरी महोत्सवा निमित्त श्रीं च्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी शुक्रवार दि. 6 जानेवारी 2023 रोजी झाली होती.  श्री भगवान शनैश्वर व वसुंधरारत्न राष्ट्रसंत सद्गुरु  डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या प्रतिमेचे यावेळी तपोनुष्ठान समितीच्या वतीने वतीने पुजन श्री.चेतन सौंदळे सर, श्री.चंद्रकांत उदगीरकर व श्री.वैजनाथआप्पा कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. शाकांभरी महोत्सवाच्या अनुषंगाने श्री शनि मंदिरात भाविकांना प्रसाद म्हणून खिचडी वाटप करण्यात आली. हजारो भाविक भक्तांनी या प्रसा

MB NEWS:चांगला माणूस बनण्यासाठी बालझुंबड सारखे उपक्रम आवश्यक- गोविंद शेळके

इमेज
  चांगला माणूस बनण्यासाठी बालझुंबड सारखे उपक्रम आवश्यक- गोविंद शेळके अंबाजोगाई..... विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे खुले व्यासपीठ बालझुंबड - 2023 चा शानदार शुभारंभ आजच्या काळात माणूस बनण्यासाठी बालझुंबड सारखे उपक्रम होणे हे अत्यावश्यक असल्याचे मत एबीपी माझा या वृत्त वाहिनीचे व्रत निवेदक गोविंद शेळके यांनी व्यक्त केले. ते प्रियदर्शन क्रीडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळाच्या वतीने सलग 23व्या वर्षी आयोजित बालझुंबड - 2023 च्या उदघाटन समारंभात बोलत होते.        यावेळी व्यासपीठावर पोतदार स्कुलचे प्राचार्य किर्तीकुमार देशमुख, प्रदीप कांदे, कु. ऋचा कुलकर्णी तसेच न्यू व्हिजन पब्लिक स्कुलचे प्राचार्य प्रवीण शेळके, फार्मसी कॉलेज चे मृणाल सिरसाट, डॉ नंदकुमार फुलारी, संयोजक तथा मंडळाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख दिनकर जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.         बालझुंबड-2023या सांस्कृतिक उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी प्रथमतः साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण व दीपप्रज्वलन करण्यात आले. या उपक्रमाची प्रस्तावना राजेश कांबळे यांनी केली. आपल्या प्रस्तावनेत र

MB NEWS:राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसा. लि. च्या माजलगाव येथील विस्तारीत सेवा कक्षाचा दि.६ रोजी शुभारंभ

इमेज
  राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसा. लि. च्या माजलगाव येथील विस्तारीत सेवा कक्षाचा दि.६ रोजी शुभारंभ परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसा. लि.चा  माजलगाव येथील विस्तारीत सेवा कक्षाचा दि.६ रोजी शुभारंभ होणार आहे. महाराष्ट्र मिरा.प. पु. संत सुश्री अलकाश्रीजी यांच्या शुभहस्ते शुभारंभ होणार  असल्याचे चेअरमन चंदुलाल बियाणी यांनी सांगितले आहे.         शुक्रवार, दिनांक ६ जानेवारी २०२३ रोजी,  सकाळी १० वाजता सिध्देश्वर (टवानी) कॉम्पलेक्स, गाळा क्रं.८, छत्रपती संभाजी महाराज चौक, माजलगाव येथे राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसा. लि.चा  माजलगाव येथील विस्तारीत सेवा कक्षाचा महाराष्ट्र मिरा.प. पु. संत सुश्री अलकाश्रीजी यांच्या शुभहस्ते शुभारंभ होणार आहे. त्याचबरोबर शुभारंभानिमित्त महाराष्ट्र मिरा. प. पु. संत सुश्रीअलकाश्रीजी यांच्या मधुर वाणीतून शुक्रवार, दिनांक ६ जानेवारी २०२३ रोजी  सायं ४ वाजता राजस्थानी मंगल कार्यालय, माजलगाव येथे संगीतमय सुंदरकांड होणार आहे.    या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन चंदुलाल मो. बियाणी (संस्थाप

MB NEWS:राज ठाकरेंचा परळी दौरा: परळीत मनसेची बैठक; उपस्थित रहा-वैजनाथ कळसकर

इमेज
  राज ठाकरेंचा परळी दौरा: परळीत मनसेची बैठक; उपस्थित रहा-वैजनाथ कळसकर   परळी वै...... मनसे प्रमुख राज ठाकरे हे १२/०१/२०२३  परळी वैजनाथ येथे येणार आहेत. या पार्श्वभूमीवर परळी मनसेच्या वतीने महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर यांनी केले आहे. राज ठाकरे यांच्या दौऱ्या बाबत बीड जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपजिल्हाध्यक्ष, जिल्हासचिव, तालुका अध्यक्ष, शहरध्यक्ष, सर्व महाराष्ट्र सैनिक यांची बैठक परळी येथे चेमरी शासकीय विश्रम ग्रह येथे दिनांक ६/१/२०२३ शुक्रवार रोजी दुपारी १ वाजता  मनसेचे नेते  दिलीप बापू धोत्रे ,सरचिटणीस  संतोष  नागरगोजे ,मनसे चे प्रवक्ते  प्रकाश  महाजन , राज्य उपाध्यक्ष  अशोक तावरे  व सतनामसिंग गुलाटी  यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात  आली आहे तरी सर्वांनी वेळेत या बैठकीस उपस्थित राहावे.    असे आवाहन मनसेचे बीड जिल्हाध्यक्ष सुमंत धस,जिल्हाउपाध्यक्ष दत्तात्रय दहीवाळ, जिल्हा सचिव रवी दादा नेमाने,तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर, शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर, यांच्यासह तालुका उपाध्यक्ष विठ्ठल झिलमेवाड

MB NEWS:दर्पण दिन कार्यक्रम : टि.व्ही.पत्रकार रश्मी पुराणिक राहणार उपस्थित

इमेज
  दै.मराठवाडा साथी व राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीनेदर्पण दिन कार्यक्रम : टि.व्ही.पत्रकार  रश्मी पुराणिक राहणार उपस्थित  परळी/ प्रतिनिधी- दै.मराठवाडा साथी व राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवार दि. 6 जानेवारी रोजी औद्योगीक वसाहत सभागृह येथे सकाळी 11 वा . दर्पण दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकरअप्पा मोगरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात साम मराठी टीव्हीच्‍या ब्युरो चिफ रश्मी पुराणिक यांचे पत्रकारिता काल, आज आणि उद्या या विषयावर विशेष व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमात त्यांच्यासोबत प्रश्नोत्तरे होणार आहेत अशी माहिती मुख्य संपादक चंदुलाल बियाणी यांनी दिली.     कै. बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी रोजी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरु केले होते. या पार्श्वभुमीवर 6 जानेवारी रोजी दर्पण दिन राज्यभरात साजरा केला जातो. या अनुषंगाने परळी येथे मराठवाडा साथी व राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने दर्पण दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नाथ रोडवर असलेल्या औद्योगीक वसाहत सभागृहात सकाळी 11 वा. सदरचा कार्यक्रम होणार आहे. या प्रसंगी मराठी