इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS:खाजगी इसम व वीजवितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

 खाजगी इसम व वीजवितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात




परळी वैजनाथ: दि. 06 : तक्रारदाराच्या सासऱ्याचे जळालेले मीटर बदलून देण्यासाठी महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञसाठी खाजगी इसमाने शुक्रवारी (दि. 6 ) दुपारी 20 हजाराची लाच स्वीकारली. या प्रकरणी दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल ज्ञानोबा नागरगोजे (वय 29, नोकरी, वरिष्ठ तंत्रज्ञ, शहर पथक क्र 1, म.रा.वि.नि. कंपनी. परळी) व खाजगी इसम वृक्षराज लक्ष्मण काळे (वय 35 रा. टोकवाडी, ता. परळी) अशी लाचखोरांची नावे आहेत. तक्रारदार यांचे सासऱ्याचे नावे असलेले घरगुती विद्युत मीटर जळल्याने सदरचे मीटर बदलून नवीन मीटर बसवून दिल्याचा मोबदला, व यापुढे जास्त बिल येऊ न देण्यासाठी नागरगोजे याने लाचेची मागणी करून पंचासमक्ष लाच रक्कम स्वीकारून लाच रक्कम खाजगी व्यक्तीकडे दिली. ही रक्कम खाजगी व्यक्तीने स्वतः पंच साक्षीदार समक्ष स्वीकारली असता लाच रकमेसह रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पो.नि. श्री. रविंद्र परदेशी, पोलीस अंमलदार भारत गारदे,  अविनाश गवळी, श्रीराम गिराम,चालक-गणेश म्हेत्रे ला.प्र.वि, बीड यांच्या पथकाने केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट