MB NEWS:दर्पण दिन कार्यक्रम : टि.व्ही.पत्रकार रश्मी पुराणिक राहणार उपस्थित

 दै.मराठवाडा साथी व राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीनेदर्पण दिन कार्यक्रम : टि.व्ही.पत्रकार रश्मी पुराणिक राहणार उपस्थित 



परळी/ प्रतिनिधी-
दै.मराठवाडा साथी व राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवार दि. 6 जानेवारी रोजी औद्योगीक वसाहत सभागृह येथे सकाळी 11 वा . दर्पण दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकरअप्पा मोगरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात साम मराठी टीव्हीच्‍या ब्युरो चिफ रश्मी पुराणिक यांचे पत्रकारिता काल, आज आणि उद्या या विषयावर विशेष व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमात त्यांच्यासोबत प्रश्नोत्तरे होणार आहेत अशी माहिती मुख्य संपादक चंदुलाल बियाणी यांनी दिली.  


 
कै. बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी रोजी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरु केले होते. या पार्श्वभुमीवर 6 जानेवारी रोजी दर्पण दिन राज्यभरात साजरा केला जातो. या अनुषंगाने परळी येथे मराठवाडा साथी व राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने दर्पण दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नाथ रोडवर असलेल्या औद्योगीक वसाहत सभागृहात सकाळी 11 वा. सदरचा कार्यक्रम होणार आहे. या प्रसंगी मराठी वृत्तवाहिनी क्षेत्रातील साम टीव्हीच्‍या रश्मी पुराणिक यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. 


     टीव्हीवरील पत्रकारिता कशी असते हा सर्वांनाच प्रश्न पडतो. या अनुषंगाने या संदर्भात व्याख्यान आणि प्रश्नोत्तरे रश्मी पुराणिक यांच्यासोबत होणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार शंकरअप्पा मोगरकर यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या कार्यक्रमास पत्रकार तसेच हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मराठवाडा साथीचे संपादक सतिश बियाणी व राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !