MB NEWS:श्रावणमास तपोनुष्ठान समिती परळीचा उपक्रम

 राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व शाकांभरी महोत्सवानिमित्त श्री शनि मंदिरात खिचडी वाटप

श्रावणमास तपोनुष्ठान समिती परळीचा उपक्रम




परळी वैजनाथ / प्रतिनिधी


वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक पोर्णिमेनिमित्त श्रावणमास तपोनुष्ठान समिती परळी वैजनाथच्या वतीने खिचडी प्रसादाचे आयोजन भाविक-भक्तांसाठी करण्यात येते तसेच शुक्रवारी आलेल्या शाकांभरी निमित्त दुहेरी योग साधत भाविकांना खिचडी प्रसाद वाटप करण्यात आले. शांकाभरी महोत्सवा निमित्त श्रीं च्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी शुक्रवार दि. 6 जानेवारी 2023 रोजी झाली होती. 

श्री भगवान शनैश्वर व वसुंधरारत्न राष्ट्रसंत सद्गुरु  डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या प्रतिमेचे यावेळी तपोनुष्ठान समितीच्या वतीने वतीने पुजन श्री.चेतन सौंदळे सर, श्री.चंद्रकांत उदगीरकर व श्री.वैजनाथआप्पा कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. शाकांभरी महोत्सवाच्या अनुषंगाने श्री शनि मंदिरात भाविकांना प्रसाद म्हणून खिचडी वाटप करण्यात आली. हजारो भाविक भक्तांनी या प्रसादाचा लाभ घेतला. वसुंधरारत्न डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमपुरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ तपोनुष्ठान समितीच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित भाविकांनी आपल्या गुरूंचे मनोभावे दर्शन घेत श्रीं चे आशिर्वाद प्राप्त केले. भाविकांनी यावेळी आरती कार्यक्रमातही सहभाग घेतला.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परळी येथील 82 व्या श्रावणमास तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष चेतन सौंदळे,  उपाध्यक्ष चंद्रकांत उदगीरकर, प्रसिद्ध व्यापारी वैजनाथअप्पा कोल्हे, कार्याध्यक्ष शाहूराव ढोबळे,  रमेश सपाटे,वैजनाथ बागवाले, गिरीष बेंबळगे, सचिव संतोष पंचाक्षरी, सोमनाथ निलंगे,नंदकुमार खानापुरे,अशोक नावंदे, सोमनाथ गोपनपाळे,सदानंद चौधरी, ओमप्रकाश बुरांडे,संजय खाकरे, कैलास भीमाशंकरअप्पा रिकीबे, दयानंद चौधरी, वैजनाथ निलंगे,वैजनाथ शेटे,अ‍ॅड. गिरीष नरवणे, चंदूअप्पा हालगे,मकरंद नरवणे,सचिन काटकर, जगदीश मिटकर, रवी मिसाळ,अरविंद चौधरी, प्रा.अमर आलदे,कैलास रिकीबे,राजाभाऊ हलकंचे, रमेश चौधरी सर,उमाकांत काळे,गजानन हालगे,बाबासाहेब शिगे, रमेश काळे,प्रकाश खोत,संतोष चौधरी,चंद्रशेखर फुटके, बाबासाहेब चौधरी, विश्वनाथअप्पा लव्हराळे,डॉ.योगीराज बर्दापुरे,संदीप तिळकरी सर,चंद्रकात अंदुरे,शिवशंकर नाईक,शिरीष सलगरे, अनिल चौधरी, नागेश अलबिदे,मन्मथ नरवणे, कपील चौधरी,शिवदीप चौंडे,संदीप चौधरी,मनोज बेंबळगे,संतोष जुजगर,अमोल घेवारे,रत्नेश बेलुरे,निरंजन गौरशेटे,अविनाश चौधरी, सतीश कापसे,नंदूअप्पा शेटे,अशोकअप्पा झाडे, जगदीश महागांवकर, संजय कोरे आदींनी प्रयत्न केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार