गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने घुले कुटुंबास पाच लाखाची मदत जाहीर

इमेज
  ना. पंकजा मुंडे यांनी मयत विलास घुलेंच्या परिवाराचे स्वीकारले पालकत्व ; दुःखात आणि न्यायाच्या लढाईतही पाठिशी बीड दि. २३ -- टाकळी- कदमवाडी (ता. केज) परिसरात झालेल्या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या विलास घुले यांच्या परिवाराचे पालकत्व स्वीकारत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजा मुंडे यांनी त्यांना मदतीचा हात दिला आहे. मयत घुले यांच्या पत्नीस गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने पाच लाख रूपयांची मदत आज त्यांनी जाहीर केली आहे.    विलास घुले याच्या हत्येच्या प्रकरणात झालेल्या दुर्दैवी घटनेचा तीव्र निषेध करत ना. पंकजा मुंडे यांनी पोलिस प्रशासनाला दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, पण कोवळ्या वयात काहीही संबंध नसताना त्याचा हकनाक मृत्यू झाल्यामुळे त्याचे कुटुंब उघड्यावर पडले असून त्यांचेवर अकाली संकट आले आहे. विलास यांचे बंधू रमेश यांच्याशी ना. पंकजाताईंनी संपर्क साधून आपण विलासच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले. तुमच्या दुःखात आणि न्यायाच्या लढाईत मी  परिवाराच्या पाठिशी  ठामपणे उभी असल्याचे सांगितले. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातू...

MB NEWS:राज ठाकरेंचा परळी दौरा: परळीत मनसेची बैठक; उपस्थित रहा-वैजनाथ कळसकर

 राज ठाकरेंचा परळी दौरा: परळीत मनसेची बैठक; उपस्थित रहा-वैजनाथ कळसकर  




परळी वै...... मनसे प्रमुख राज ठाकरे हे १२/०१/२०२३  परळी वैजनाथ येथे येणार आहेत. या पार्श्वभूमीवर परळी मनसेच्या वतीने महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर यांनी केले आहे.

राज ठाकरे यांच्या दौऱ्या बाबत बीड जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपजिल्हाध्यक्ष, जिल्हासचिव, तालुका अध्यक्ष, शहरध्यक्ष, सर्व महाराष्ट्र सैनिक यांची बैठक परळी येथे चेमरी शासकीय विश्रम ग्रह येथे दिनांक ६/१/२०२३ शुक्रवार रोजी दुपारी १ वाजता  मनसेचे नेते  दिलीप बापू धोत्रे ,सरचिटणीस  संतोष  नागरगोजे ,मनसे चे प्रवक्ते  प्रकाश  महाजन , राज्य उपाध्यक्ष  अशोक तावरे  व सतनामसिंग गुलाटी  यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात  आली आहे तरी सर्वांनी वेळेत या बैठकीस उपस्थित राहावे.

   असे आवाहन मनसेचे बीड जिल्हाध्यक्ष सुमंत धस,जिल्हाउपाध्यक्ष दत्तात्रय दहीवाळ, जिल्हा सचिव रवी दादा नेमाने,तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर, शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर, यांच्यासह तालुका उपाध्यक्ष विठ्ठल झिलमेवाड ,शहर उपाध्यक्ष प्रशांत कामाळे, गणेश चव्हाण, महेश शिवगण, ऋषिकेश बारगजे, शहर सचिव डॉक्टर आशोक मंत्री, मनविसे शहर अध्यक्ष हनुमान सातपुते आदीनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या