MB NEWS:_सम्येद शिखरजी तीर्थस्थान जैन धर्मीयांच्या आस्था आणि श्रध्देचे प्रतिक

 जैन धर्मीयांच्या मागणीचा सकारात्मक विचार होणे आवश्यक - पंकजाताई मुंडे यांची मागणी




_सम्येद शिखरजी तीर्थस्थान जैन धर्मीयांच्या आस्था आणि श्रध्देचे प्रतिक


मुंबई  । दिनांक ०६।
सम्येद शिखरजी तीर्थस्थान जैन धर्मीयांच्या आस्था आणि श्रध्देचे प्रतिक असल्याने या तीर्थस्थाना संदर्भात समस्त जैन धर्मीयांनी केलेल्या मागणीचा सकारात्मक विचार होणे आवश्यक आहे अशी अपेक्षा  भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.

  सम्येद शिखरजी हे जैन धर्मीयांचे पवित्र तीर्थस्थळ आहे. झारखंड सरकारने या तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळाचा दर्जा जाहीर केला आहे. या निर्णयाबद्दल देशातील समस्त जैन समाजाने तीव्र नाराजी व्यक्त करत  तीर्थक्षेत्राला दिलेला पर्यटन स्थळाचा दर्जा रद्द करावा अशी मागणी केली आहे.

  यासंदर्भात पंकजाताई मुंडे यांनी ट्विट केले आहे. " सम्येद शिखरजी हे जैन धर्मीयांच्या आस्था आणि श्रध्देचे प्रतिक आहे. पर्यटन स्थळाचा दर्जा इथल्या पवित्र तीर्थस्थानाला बाधा आणणारे आहे, त्यामुळे जैन समाजाच्या मागणीचा सकारात्मक विचार होणे आवश्यक आहे" अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
•••• 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !