MB NEWS:चांगला माणूस बनण्यासाठी बालझुंबड सारखे उपक्रम आवश्यक- गोविंद शेळके

 चांगला माणूस बनण्यासाठी बालझुंबड सारखे उपक्रम आवश्यक- गोविंद शेळके




अंबाजोगाई.....
विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे खुले व्यासपीठ बालझुंबड - 2023 चा शानदार शुभारंभ आजच्या काळात माणूस बनण्यासाठी बालझुंबड सारखे उपक्रम होणे हे अत्यावश्यक असल्याचे मत एबीपी माझा या वृत्त वाहिनीचे व्रत निवेदक गोविंद शेळके यांनी व्यक्त केले. ते प्रियदर्शन क्रीडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळाच्या वतीने सलग 23व्या वर्षी आयोजित बालझुंबड - 2023 च्या उदघाटन समारंभात बोलत होते. 
 

    यावेळी व्यासपीठावर पोतदार स्कुलचे प्राचार्य किर्तीकुमार देशमुख, प्रदीप कांदे, कु. ऋचा कुलकर्णी तसेच न्यू व्हिजन पब्लिक स्कुलचे प्राचार्य प्रवीण शेळके, फार्मसी कॉलेज चे मृणाल सिरसाट, डॉ नंदकुमार फुलारी, संयोजक तथा मंडळाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख दिनकर जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

   
    बालझुंबड-2023या सांस्कृतिक उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी प्रथमतः साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण व दीपप्रज्वलन करण्यात आले. या उपक्रमाची प्रस्तावना राजेश कांबळे यांनी केली. आपल्या प्रस्तावनेत राजेश कांबळे यांनी प्रियदर्शनी क्रीडा, सांस्कृतिक मंडळ तथा बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी अंबाजोगाई तालुक्यातील शाळा व विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेल्या बालझुंबड या उपक्रमाविषयीची संकल्पना स्पष्ट केली.


    
    अंबाजोगाई पंचक्रोशी तसेच ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी असलेले कलागुण सादर करण्यासाठी एक नवीन व्यासपीठ उपलब्ध करून दिले. यावर्षी बालझुंबड या उपक्रमाचे तेवीसावे वर्ष असून प्रत्येक वर्षी 7000 ते 8000 विध्यार्थी आपला सहभाग नोंदवून कलाविष्कार सादर करत असल्याचे राजेश कांबळे यांनी आपल्या प्रस्तावनेत सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !