इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसा. लि. च्या माजलगाव येथील विस्तारीत सेवा कक्षाचा दि.६ रोजी शुभारंभ

 राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसा. लि. च्या माजलगाव येथील विस्तारीत सेवा कक्षाचा दि.६ रोजी शुभारंभ



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
     राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसा. लि.चा माजलगाव येथील विस्तारीत सेवा कक्षाचा दि.६ रोजी शुभारंभ होणार आहे.महाराष्ट्र मिरा.प. पु. संत सुश्री अलकाश्रीजी यांच्या शुभहस्ते शुभारंभ होणार  असल्याचे चेअरमन चंदुलाल बियाणी यांनी सांगितले आहे.


        शुक्रवार, दिनांक ६ जानेवारी २०२३ रोजी,  सकाळी १० वाजता सिध्देश्वर (टवानी) कॉम्पलेक्स, गाळा क्रं.८, छत्रपती संभाजी महाराज चौक, माजलगाव येथे राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसा. लि.चा माजलगाव येथील विस्तारीत सेवा कक्षाचा महाराष्ट्र मिरा.प. पु. संत सुश्री अलकाश्रीजी यांच्या शुभहस्ते शुभारंभ होणार आहे. त्याचबरोबर शुभारंभानिमित्त महाराष्ट्र मिरा. प. पु. संत सुश्रीअलकाश्रीजी यांच्या मधुर वाणीतून शुक्रवार, दिनांक ६ जानेवारी २०२३ रोजी  सायं ४ वाजता राजस्थानी मंगल कार्यालय, माजलगाव येथे संगीतमय सुंदरकांड होणार आहे.


   या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन चंदुलाल मो. बियाणी (संस्थापक अध्यक्ष),
बालचंद लोढा (उपाध्यक्ष)सचिव बद्रीनारायण बाहेती, पी.डी. अग्रवाल(सह-सचिव) विजय लड्डा(कोषाध्यक्ष)
संचालक मंडळ:अशोक जाजू, सतीश सारडा, सौ. प्रेमलता बाहेती, सौ. कल्पना बियाणी, नामदेवराव रोडे, अजय पुजारी, . जगदिश बियाणी (कार्यकारी संचालक), व्ही. बी. कुलकर्णी (मुख्य कार्यकारी अधिकारी), पी.जी. कुलकर्णी (उपमुख्य कार्यकारी अधिकारी), अर्चना मुंदडा (सर व्यवस्थापिका), विद्याधर वैद्य (विकास अधिकारी), राधेश्याम झंवर (विभागीय व्यवस्थापक, औरंगाबाद), अशोक राठोड (शाखा व्यवस्थापक), स्थानिक सल्लागार मंडळ :सुरेंद्र रेदासनी, तुकाराम येवले, डॉ. सुशील लोढा, रामनारायण बजाज, मनोज दुगड, डॉ. नितीन अकोलकर, कमलेश जाब्रस, पुरुषोत्तम करवा, राधेश्याम जेथलिया, अजय रूद्रवार, कुणाल दुगड, साहेब उगले, उमेश मोगरेकर, प्रा. चंद्रशेखर जगदाळे आदींनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!