MB NEWS:अनुकंपाअंतर्गत नोकरीस घेण्यास टाळाटाळ; प्रजासत्ताक दिनी प्राणांतिक उपोषणाचा इशारा

 अनुकंपाअंतर्गत नोकरीस घेण्यास टाळाटाळ; प्रजासत्ताक दिनी प्राणांतिक उपोषणाचा इशारा





परळी वैजनाथ ता.०६ ...

             शहरातील वैद्यनाथ माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक प्रल्हाद शिवाजी जोगदंड सेवेत असताना कार्यालयीन कामाच्या दिवशी ४ आँगस्ट २०१४ ला निधन झाले असून अनुकंपा योजनेअंतर्गत प्रयोगशाळा सहाय्यक किंवा कनिष्ठ लिपिक नियुक्ती देण्यासाठी मुलगी अंजली प्रल्हाद जोगदंड यांनी विनंती अर्ज केला होता. मात्र तो अद्यापही यावर काही कारवाई झाली नाही. यामुळे प्रजासत्ताकदिनी प्राणांतिक उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

           अंजली प्रल्हाद जोगदंड यांनी वडीलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर नौकरी मिळावी यासाठी शिक्षणाधिकारी यांच्याकडे अर्ज केला मात्र शिक्षणाधिकारी यांच्याकडून या अर्जाबाबत कोणतेही कार्यवाही केली जात नाही किंबहुना कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. घरामध्ये कमावती व्यक्ती नसल्यामुळे प्रल्हाद शिवाजीराव जोगदंड यांच्या कुटुंबाची त्यांच्या जाण्याने उपासमारीची वेळ आली आहे. प्रल्हाद शिवाजीराव जोगदंड यांची मुलगी अंजली प्रलाद जोगदंड बारावी उत्तीर्ण असूनही अनुकंपा अंतर्गत नोकरी पासून तिला जाणून-बुजून वंचित ठेवत आहेत. त्यामुळे प्रल्हाद शिवाजीराव जोगदंड यांची पत्नी वैशाली प्रल्हाद जोगदंड, मुलगी अंजली प्रल्हाद जोगदंड, प्रांजल प्रल्हाद जोगदंड यांनी नोकरीचे आदेश मिळेपर्यंत २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण करणार असल्याचे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच, जीवितास धोका निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असे स्वाती प्रल्हाद जोगदंड यांनी निवेदनातून इशारा दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार