इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS:कोष्टी समाज परळीच्या वतीने आयोजन; सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रम

 टाळ, मृदंगासह ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात श्री रामलिंग चौंडेश्वरी पारायण सोहळ्याची भक्तीपूर्ण वातावरणात सांगता; भाविकांची लक्षणिय उपस्थिती




कोष्टी समाज परळीच्या वतीने आयोजन; सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रम


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) 

परळी शहरातील कोष्टी समाज बांधवांच्या वतीने श्री रामलिंग चौंडेश्वरी देवांग पुराण पारायण सोहळ्याची आज शुक्रवार दिनांक 6 जानेवारी रोजी ज्ञानोबा, तुकारामच्या जय घोषात भक्तीपूर्ण वातावरणात सांगता झाली.दि.30 डिसेंबर पासून सात दिवस चाललेल्या विविध धार्मीक कार्यक्रमास परळी शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांची मोठी उपस्थिती लाभली.

परळीतील गुरूकृपानगर येथील श्री हरेगावकर यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या या चौंडेश्वरी देवांग पुराण पारायण सोहळ्याचे दि.30 डिसेंबर ते 6 जानेवारी दरम्यान  आयोजन करण्यात आले होतेे. आज सकाळी 11 वा

परळी शहराच्या विविध मार्गावरून श्री चौंडेशवरी देवीच्या प्रतिमेची सवादय शोभायात्रा काढणयात आली. यात भाविक भक्त मोठया संखयेने सहभागी झाले होते. टाळ, मृदंगासह ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात श्री रामलिंग चौंडेश्वरी पारायण सोहळ्याची भक्तीपूर्ण वातावरणात ही शोभायात्रा निघाली. महिला भाविकांनी यावेळी फुगडया खेळून आनंद साजरा केला. या कार्यक्रमात सकाळी 7 ते 10 या वेळेत श्री रामलिंग चौंडेश्वरी देवांग पुराणाचे पारायण संपन झाले. पारायणप्रमुख सौ.लताताई येळाये यांच्या रसाळ व ओजस्वी वाणीतून हा पारायण सोहळा संपन्न झाला. दररोज सायंकाळी 5 ते 7 या वेळेत  हरीपाठ, भजन, कीर्तन आदी धार्मीक कार्यक्रमांचेही आयोजन करणयात आले होतेश

गेलया सात दिवसापासून सुरू असलेल्या या सर्व धार्मिक कार्यक्रमास भाविक-भक्तांची मोठी गर्दी झाली होती. सकाळच्या व संध्याकाळच्या सत्रातील व चौंडेश्वरी देवांग पुराण पारायण व हरीपाठ, भजन, कीर्तन श्रवणासाठी शहरातील महिला-पुरूष मोठ्या संख्येने हजेरी लावत होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परळी कोष्टी समाजातील महिला, पुरूष परिश्रम घेतले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या