इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS:स्वामी समर्थ पतसंस्था ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरत आहे - पी एस घाडगे

 स्वामी समर्थ पतसंस्था ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरत आहे - पी एस घाडगे




परळी वै.ता.७ प्रतिनिधी

      पिग्मी एजंटानी स्थापन केलेली श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्था ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरत आहे. ही पतसंस्था सामान्यांचा आधार व्हावी असे मत जेष्ठ नेते तथा सहकार क्षेत्राचे अभ्यासक कॉ पी एस घाडगे यांनी व्यक्त केले.

      श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने काढलेल्या दिनदर्शीका २०२३ चे प्रकाशन जेष्ठ नेते पी एस घाडगे व पांडुरंग राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. पतसंस्थेचे अध्यक्ष पवनकुमार जैस्वाल यांनी पी एस घाडगे सरांचा सत्कार केला. यावेळी जैस्वाल यांनी पतसंस्थेचा व्यवहार दिवसेंदिवस वाढत असल्याचे सांगीतले. यावेळी बोलताना घाडगे सरांनी सांगीतले की या पतसंस्थेचे उद्घघाटन १८ वर्षापुर्वी माझ्याच हस्ते झाले होते. आकर्षकपणे काढण्यात आलेल्या दिनदर्शीकेचे प्रकाशन करतांना मनस्वी आनंद होत आहे. श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्था परळी शहरातील सामान्यांचा आधार बनत चाललीय ही बाब कोतुकास्पद असल्याचे मत घाडगे सरांनी व्यक्त केले. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष पवनकुमार जैस्वाल, सचिव लक्ष्मण वाकडे, उपाध्यक्ष सुनिता वाघमोडे, राजाभाउ आढाव, राजेश्वर निला, सचिन मुंदडा, संजय गोरे, सुमन चव्हाण, सुवर्णा जंगले, विद्या मुंडलीक, व्यस्थापक प्रकाश चव्हाण यांची उपस्थीती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बसवेश्वर खोत, पिग्मी एजंट रमेश बागवाले, प्रदिप राठोड, वैजनाथ चव्हाण, विष्णु लिखे व विकास उडाणशीव यांनी प्रयत्न केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या