इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

खळबळजनक:लग्न केल्याचे भासवून २१ वर्षिय तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार : गुन्हा दाखल

 खळबळजनक:लग्न केल्याचे भासवून २१ वर्षिय तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार : गुन्हा दाखल



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

        लग्न केल्याचे भासवून एका २१ वर्षिय  तरुणीवर १५ दिवस शारिरीक अत्याचार केले.त्यानंतर जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करूनणतिला हाकलून दिल्याची अत्याचाराची घटना परळी तालुक्यातील कन्हेरवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरुन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी  याने फिर्यादी २१ वर्षिय तरुणी सोबत लग्न केल्याचे भासवुन फिर्यादी सोबत सतत दहा ते पंधरा दिवस शारीरीक संबंध प्रस्थापीत केले.त्यानंतर फिर्यादीस तु मांगाची आहेस, तुझी जात चांगली नाही. तुम्ही पीठमागे आहात असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली. दि. 31/08/2023 रोजी फिर्यादीस घरी घेवुन जावुन तीच्या संमतीविना, इच्छेविरुद्ध बळजबरीने तीच्यासोबत शारीरीक संबंध केले. फिर्यादीस मारहाण करून घरातुन हाकलुन दिले. याप्रकरणी पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरुन आरोपीविरुद्ध गुरनं 172/2023 कलम 376, 376 (2) (N), 417 भादवी सह कलम 3(1) (W) (1) (1),3 (2) (V) अजाज अप्रका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अंबाजोगाई अनिल चोरमले  हे करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या