गोपीनाथराव मुंडे यांचा वारसा चालवणाऱ्यांनी वैद्यनाथ कारखाना विकला?- सुदामती गुट्टे

सर्व जाती-धर्माला घेऊन चालणारा राज्यकर्ता असेल तरच विकास होऊ शकतो- राजेसाहेब देशमुख गोपीनाथराव मुंडे यांचा वारसा चालवणाऱ्यांनी वैद्यनाथ कारखाना विकला?- सुदामती गुट्टे परळी,(प्रतिनिधी):-निष्क्रिय माणसच जातिवाद करत असतात. ज्यांना काम करायच नाही ते जाती-जातीत भांडण लावून आपली पोळी भाजून घेतात. कृषिमंत्र्यांनी या भागातील शेतकऱ्यांना विमा नाही, अनुदान नाही, 25% अग्रीम रक्कम नाही. बेकार युवकांना रोजगार नाही. एकही नवा उद्योग त्यांनी परळी विधानसभा मतदारसंघात आणला नाही. गावात रस्ते नाहीत नाल्या नाहीत. पाच वर्षात ते कधी गावात फिरकलेही नाहीत. सर्व जाती-धर्माला घेऊन चालणारा राज्यकर्ता असेल तरच सर्वांगीण विकास होऊ शकतो. जातीपातीचे राजकारण करून मते मिळविण्याचे उद्योग सुरू आहेत.मतदार बंधू भगिनींनी मला भरघोस मतांनी विजयी करावे व आपली सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केले. गुट्टेवाडी येथे मतदारांची संवाद साधताना ते बोलत होते. या प्रसंगी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सुधामती गुट्टे, वै...