पोस्ट्स

धावत्या दुचाकीवरून सेल्फी काढणे पडले महागात, एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर

इमेज
  धावत्या दुचाकीवरून सेल्फी काढणे पडले महागात, एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर बीड  : सध्या सेल्फिचा ट्रेण्ड आहे. धावत्या दुचाकीवरून सेल्फी रिल बनवीत असतानाच, अपघात होवून एकाचा जागीच मृत्यू झालाय. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपासवर घडली आहे. तर हा अपघात होतानाची दृश्ये त्यांनी घेतलेल्या सेल्फी व्हिडीओत कैद झाली आहेत. दोघंही तरुण जालन्याचे रहिवासी आहेत. सोलापूर- धुळे महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असून आता एक नवीनच प्रकार समोर आला आहे दुजाकी वर असलेल्या दोघांचा सेल्फी काढण्याच्या नादात अपघात झाला या अपघातात एकाला आपले प्राण गमवावे लागले तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू असून हे दोघेही जालना जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते त्या दिशेने पोलिस आता अधिक तपास करत आहेत.

अभिष्टचिंतन: ✍️ सुधीर सांगळे यांचा विशेष लेख >>>>>एक वाल्मिक अण्णा सोबतीला हवाच!

इमेज
  एक वाल्मिक अण्णा सोबतीला हवाच! वाल्मिक बाबुराव कराड अर्थात सर्वांचे लाडके वाल्मिक अण्णा या नावाची बीड जिल्ह्याला आणि मुंबईच्या मंत्रालयाला वेगळी ओळख सांगायची गरज नाही! राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ते अगदी पूर्वाश्रयीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनाही आपल्या उत्कृष्ट नियोजनाची भुरळ पाडणारे वाल्मिक अण्णा, असा एक कार्यकर्ता प्रत्येक मोठ्या नेत्यांसोबत असावा, अशी इच्छा वरील पैकी सर्वांनिच बोलून दाखवली. इतकेच नाही तर काही बड्या नेत्यांनी तर चक्क धनुभाऊंना तुमचे वाल्मिक अण्णा आम्हाला द्या, अशी जाहीर मागणीच केली! या गोष्टी सहज घडत नसतात, त्यामागे अपार कष्ट, मेहनत, वेगवेगळा सोसलेला त्रास, अनेकांचे काढलेले रुसवे फुगवे, त्याग, समर्पण अशा विशेषणांची एक मालिकाच असते.  वाल्मिक अण्णा एखाद्या नामांकित इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला लाजवेल असे सुरेख व अद्वितीय नियोजन सभा-कार्यक्रमांचे करतात. एखादा कार्यक्रम त्यांनी मनावर घेतला तो असा घडतो, की तसा कार्यक्रम पुन्हा होणे नाही, त्यापुढच्या कार्यक्रमात ते मागच्या कार्यक्रम

आरक्षणाच्या लढाईत सुरुवातीपासून मुंडेंचा सहभाग, जरांगे पाटलांच्या आंदोलनातही शिष्टाई

इमेज
  अंबाजोगाईत मराठा समाजाच्या वतीने कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा सत्कार आरक्षणाच्या लढाईत सुरुवातीपासून मुंडेंचा सहभाग, जरांगे पाटलांच्या आंदोलनातही शिष्टाई अंबाजोगाई (दि. 28) - मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईला मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात यश आल्यानंतर आज अंबाजोगाई येथे राज्य सरकारचे प्रतिनिधी व आरक्षणाच्या लढाईतील सक्रिय सहभाग घेतलेले राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा मराठा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.  मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात उभारलेल्या आंदोलनास 26 जानेवारी रोजी मोठे यश प्राप्त झाले. महायुती सरकारने समाजाच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या, त्यामुळे महायुती सरकारचे प्रतिनिधी म्हणून धनंजय मुंडे यांचा सत्कार समाजाच्या वतीने करण्यात आला.  धनंजय मुंडे यांनी राजकीय आयुष्यात सन 1999 पासून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने कायम पाठिंबा दिलेला आहे. 2007 साली बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना त्यांनी सर्वात प्रथम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा ठराव मांडून संमत करून घेतला होता.  त्यानंतर देखील विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते असताना स

खा.प्रितम मुंडे यांनी दिव्यांगांना दिला विश्वास

इमेज
दिव्यांगांना शासनाच्या सर्व योजना आणि सुविधांचा लाभ एकाच छताखाली मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील  ;पूर्व तपासणी शिबिरातील पात्र लाभार्थ्यांना केले निःशुल्क साहित्याचे वाटप गेवराई । दि. २८ ।  जन्मतः दिव्यांगत्वाची विशिष्ट शक्ती लाभलेल्या दिव्यांग बांधवांचे जीवन कष्टमुक्त करण्यासाठी शासनातर्फे अनेक योजना राबविल्या जात आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या या योजनांचा लाभ बीड जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना एका छताखाली मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे खा.प्रितमताई मुंडे यांनी सांगितले. गेवराई येथे आयोजित निःशुल्क सहायक साधनांच्या वितरण प्रसंगी त्या बोलत होत्या. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान मार्फत गेवराई तालुक्यातील दिव्यांगांसाठी आयोजित केलेल्या पूर्व तपासणी शिबिरातील पात्र लाभार्थ्यांना खा. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते निःशुल्क सहायक साधनांचे वितरण करण्यात आले. गेवराईचे आमदार लक्ष्मन पवार, जिल्हा परिषदेचे सदस्य पांडुरंग थडके, जेडी शाह, दीपक सुरवसे, शाम कुंड,ज्ञानेश्वर खाडे, गहिनीनाथ पालवे, गणेश मुंडे, निलेश सानप यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लाभार्थी उपस्थित होते. पुढे बोलतान

सर्वांचे सहकार्य व गावकऱ्यांचे योगदान यामुळे पुरस्कार- डॉ. राजाराम मुंडे

इमेज
  आर.आर.(आबा) पाटील सुंदरगाव पुरस्कार:परळी तालुक्याला बहुमान: टोकवाडी ठरली 'स्मार्ट व्हिलेज'  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....          स्वच्छ, सुंदर व विकासाभिमुख गाव म्हणून परळी तालुक्यातील टोकवाडी ग्रामपंचायतचा नावलौकिक आहे. या ग्रामपंचायतीने स्वच्छता अभियानातील जिल्हास्तरावरील व विभागीय स्तरावरील पारितोषिके पटकावलेली आहेत. यामध्ये आता मानाचा तुरा खोवला गेला असून बीड जिल्ह्यात आर.आर .(आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार टोकवाडी ग्रामपंचायतने पटकावला आहे. परळी तालुक्याचा हा बहुमान असून परळी तालुक्यात टोकवाडी हे गाव स्मार्ट व्हिलेज ठरले आहे.            26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शासकीय पातळीवरील विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये आर. आर. (आबा) पाटील सुंदरगाव पुरस्कार (२०२१-२२) परळी तालुक्यातील टोकवाडी ग्रामपंचायतने पटकावला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी स्मार्ट व्हिलेज पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.या पुरस्काराचे स्वरूप 50 लाख रुपये रोख, मानचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे. पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्यासह बीडच्या जिल्ह

गंगथडीचा नायक ते मराठायोद्धा, मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा, मनोज जरांगे यांचा संघर्षमय प्रवास

इमेज
  गंगथडीचा नायक ते मराठायोद्धा, मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा, मनोज जरांगे यांचा संघर्षमय प्रवास मुंबई :  मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वात मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक नवी मुंबईत दाखल झाले आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचे ते चेहरा बनले आहेत. जालन्यातील आंतरवाली सराटीत ३१ ऑगस्टला कुणबी नोंदीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज झाला आणि मनोज जरांगे यांचं नाव मोठ्या पातळीवर प्रकाशझोतात आलं. मनोज जरांगे यांनी सातत्यानं विषय लावून धरत त्यांच्या मागण्या मान्य करुन घेतल्या आहेत. गेल्या पाच महिन्यात मनोज जरांगे यांची ओळख गंगथडीचा नायक ते मराठा योद्धा असा प्रवास झाला आहे. गंगथडीचा नायक ते मराठा योद्धा असा प्रवास मनोज जरांगे पंधरा वर्षांपासून मराठा आरक्षण आणि शेतकरी प्रश्नांवरील छोटी मोठी आंदोलनं त्यांच्या शिवबा संघटनेच्या माध्यमातून करत होते. मराठा आरक्षण आंदोलन जालन्यातील आंतरवाली सराटीत होत असलं तरी मनोज जरांगे यांचं मूळ गाव बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मातोरी हे आहेत. मनोज जरांगे यांना मानणारा मोठा वर्ग अंबड, घनसावंग आणि गेवराई तालुक्यात आहे. या भागातून गोदावरी नदी वाहते. यालाच गंगथडी

महाराष्ट्र ठरला सहा पद्मभूषण तर सहा पद्मश्रींचा मानकरी

इमेज
  महाराष्ट्राला १२ पद्म पुरस्कार जाहीर महाराष्ट्र ठरला सहा पद्मभूषण तर सहा पद्मश्रींचा मानकरी • दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ नेते राम नाईक, संगीतकार प्यारेलाल यांच्यासह सहा जणांना पद्मभूषण पुरस्कार • सामाजिक कार्यकर्ते शंकर बाबा  पापळकर ,  मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे ,  नेत्रतज्ञ मनोहर डोळे  सह सहा मान्यवरांना  पद्मश्री   पुरस्कार नवी दिल्ली, 25 :  सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा आज रात्री उशीरा  करण्यात आली.  प्रसिध्द साहित्यिक होर्मुसजी कामा यांना (साहित्य व शिक्षण-पत्रकारिता) क्षेत्रात, अश्विन मेहता यांना (वैधक), ज्येष्ठ नेते राम नाईक यांना (सार्वजनिक सेवा), दिग्दर्शक राजदत्त आणि प्यारेलाल शर्मा यांना (कला) तर कुंदन व्यास यांना (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता) क्षेत्रात पद्म भूषण यांच्यासह महाराष्ट्रातील अन्य सहा मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणा-या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. गृह मंत्रालयाकडून आज या मानाच्या पद्म पुरस्कारांच

प्रा.डॉ.सिद्धार्थ तायडे यांचा विशेष लेख>>>>>>समाजप्रबोधनकार : भीमयुगकार रानबा गायकवाड

इमेज
  समाजप्रबोधनकार : भीमयुगकार रानबा  गायकवाड २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.  भारतीय संविधान अंगीकृत आणि अधिनियमीत करून स्वीकृत केलेला मंगलमय दिन!याच दिवसाचा आणखी एक विलक्षण योग म्हणजे  समाजप्रबोधनकार साहित्यिक संपादक रानबा गायकवाड यांचा जन्मदिवस.सर्वप्रथम त्यांना जन्मोत्सव निमित्ताने सम्यक मंगलकामना! विश्वरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून आपण लेखणी हाती घेतली .कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पावलांनी पुनीत झालेल्या  रयत शिक्षण संस्था सातारा परिसरात  आपल्या आयुष्याची बांधणी केली.आपण पत्रकारिता क्षेत्राला जरी सेवा दिली असली तरी आपण आपल्यातील साहित्यिक-रंगकर्मी सतत जागा ठेवला. अनेक नाटकांमध्ये आपण अभिनय करुन आपल्यातल्या नटाची साक्ष दिली अनेक नाटकांचे अत्यंत सकस आणि अर्थपूर्ण असे नाटयलेखनही केले आहे. आपल्या सशक्त लेखणीतून साकारलेली आणि प्रतिभावंत  सर्जनशील दिग्दर्शक प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांनी दिग्दर्शित केलेली 'भीमयुग' ही नाट्यकृती म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीदर्शी विचारांचा नाट्याविष्कार  होय. डॉ.बाबासाहेब

विद्या कुलकर्णी यांना राष्ट्रपती पदक जाहीर

इमेज
  विद्या कुलकर्णी यांना राष्ट्रपती पदक जाहीर सीबीआय च्या जॅाईंट डायरेक्टर विद्या जयंत कुलकर्णी IPS यांना आज उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले. मूळ सोलापूर जिल्ह्यातील तिऱ्हे या छोट्याशा गावातील असलेल्या विद्या कुलकर्णी तसेच पंढरपूर हे आजोळ असलेल्या १९९८ बॅचच्या तामिळनाडू केडर च्या आयपीएस आहेत. तिऱ्हे  च्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेऊन नंतर सांगली वालचंद या प्रतिष्ठित महाविद्यालयातून बीई ( कॉम्प्युटर ) चे शिक्षण घेतले आहे. सध्या त्या सीबीआय च्या जॅाईंट डायरेक्टर ( साऊथ झोन ) पदावर दिल्ली येथे कार्यरत आहेत. धुळे येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता सौ. वर्षा घुगरी यांच्या त्या लहान भगिनी आहेत.

शिस्तबध्द ग्रंथदिंडीने परळीकरांचे लक्ष वेधले!

इमेज
  परळीत कोष्टी समाजाच्या वतीने आयोजित श्री रामलिंग चौंडेश्वरी देवी उत्सवाची थाटात सांगता बाल कीर्तनकार ह.भ.प.गौरी हरेगावकर यांचे कीर्तन;  परळी/संतोष जुजगर-  होमहवण, ग्रंथदिंडी, काल्याचे किर्तन व महाप्रसादाने गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या श्री रामलिंग चौंडेश्वरी देवी देवांग पुराण पारायण  सोहळा मोठ्या थाटा- माटात पार पडला. कोष्टी समाजाने आयोजित केलेल्या  कार्यक्रमांचा परळी व पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घेतला. शिस्तबध्द पध्दतीने निघालेल्या ग्रंथदिंडीकडे परळीकरांचे लक्ष वेधले. लहान मुलांच्या हातातील भगवे पताके , रामलिंग चौंडेश्वरी मातेचा व  रामकुष्ण हरी  चा जयघोषाने परळीनगरी दणाणली होती. टाळ- मृदंग  यामुळे सर्वजण मंञमुग्ध झाले होते.           शहरातील गुरूकृपानगर येथील श्री हनुमान मंदिर येथे दि.25 जानेवारी रोजी रोजी श्री रामलिंग चौंडेश्वरी देवांग पुराण पारायण व मान्यवरांच्या उपस्थीत ग्रथंपुजा करून प्रारंभ करण्यात आला होता. या वेळी मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थीती लाभत होती. पारायण व्यासपीठ प्रमुख म्हणून सौ. सोनाली हरेगांवकर या होत्या.       या सप्ताहाची सांगता दि. 25 जानेवारी 2024 र

आरोग्य हॉस्पिटल व अ‍ॅडव्हान्स्ड लॅप्रोस्कोपी सेंटरचा २६ जानेवारीला शुभारंभ

इमेज
 ना.धनंजय मुंडे,खा.डाॅ.प्रितम मुंडे यांच्या उपस्थितीत आरोग्य हॉस्पिटल व अ‍ॅडव्हान्स्ड लॅप्रोस्कोपी सेंटरचा २६ जानेवारीला शुभारंभ परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... जनरल व लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. संतोष रघुनाथ मुंडे व स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ. प्रज्ञा मुंडे (ढाकणे) यांच्या आरोग्य हॉस्पिटल व अ‍ॅडव्हान्स्ड लॅप्रोस्कोपी सेंटरचा ना.धनंजय मुंडे,खा.डाॅ.प्रितम मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवार, २६ जानेवारी २०२४  सायं.६ वा.होणार आहे.       आरोग्य हॉस्पिटल व अ‍ॅडव्हान्स्ड लॅप्रोस्कोपी सेंटरचा नाथ रोड, कृष्णा टॉकीजच्या बाजुला, नेहरू चौक (तळ), परळी वैजनाथ येथे शुभारंभ करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. अशोक बडे (जिल्हा शल्य चिकित्सक, बीड.), डॉ. उल्हास गंडाळ( जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड.), डॉ. लक्ष्मण मोरे (तालुका आरोग्य अधिकारी, परळी वै.), डॉ. अरूण गुट्टे (वैद्यकीय अधिक्षक, परळी वै.), डॉ. राजेश दरडे (वैष्णवी हॉस्पिटल, लातूर), डॉ. प्रदिप हुशे (जालना हॉस्पिटल, जालना), डॉ. शालिनी कराड (कराड हॉस्पिटल, परळी वै.), डॉ. बालासाहेब कराड (कराड हॉस्पिटल, परळी वै.) , डॉ. ज्ञानेश्व

अभिष्टचिंतन लेख:परळीच्या वैभवात भर घालणारे साहित्यिक रानबा गायकवाड

इमेज
  परळीच्या वैभवात भर घालणारे साहित्यिक रानबा गायकवाड              26 जानेवारी हा दिवस भारतीय इतिहासातला सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. ज्या दिवशी भारताला स्वतःचे सार्वभौमत्व असलेले प्रजासत्ताक राज्य मिळाले. लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य. लोकशाहीच्या मार्गाने जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश म्हणून ओळख निर्माण करणारी, जगातील सर्वात सुंदर लिहिली गेलेली राज्यघटना संविधान निर्माते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला अर्पण केली.  त्या दिवसापासून भारतीय समाज रचनेचा गाडा हा राज्यघटनेच्या मार्फत सुरू झाला. तो ऐतिहासिक दिवस म्हणजे 26 जानेवारी होय.     कायद्यापुढे सर्व समान आहेत. स्वातंत्र्य, बंधूता, समता या महान विचारांची जपणूक करणारी, प्रत्येक भारतीयाला भारत देशा प्रति प्रेम प्रदान करणारी, भारत देशामधील प्रत्येक जाती-धर्माच्या माणसाला स्वतंत्रता बहाल करणारी, प्रत्येक भारतीयाला देश प्रेम शिकवणारी, देशाप्रती देश भावना चेतावणारी राज्यघटना भारताला बाबासाहेबांनी दिली.  या राज्यघटनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेला दिवस म्हणजे 26 जानेवारी. हा भारतीय इतिहासातला सर्वात महत्त्वाचा

स्व . श्यामराव देशमुख स्मृतिसमारोह व्याख्यानमाला

इमेज
  रामायण, महाभारत हे जगाला विवेक व आदर्श चरित्र देणारे ग्रंथ -अभय भंडारी स्व . श्यामराव देशमुख स्मृतिसमारोह व्याख्यानमाला    परळी वैजनाथ दि.२५ (प्रतिनिधी)      रामायण, महाभारत हे जगाला विवेक व आदर्श चरित्र देणारे ग्रंथ असल्याचे प्रतिपादन अभय भंडारी यांनी केले. येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयामध्ये आयोजित श्यामराव देशमुख स्मृती समारोहात अभय भंडारी बोलत होते.        या प्रसंगी कार्यक्रमात अध्यक्ष संजय देशमुख तसेच सचिव रवींद्र देशमुख,कोषाध्यक्ष प्रा प्रसाद देशमुख, संस्थेच्या संचालिका छाया देशमुख, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ विद्या देशपांडे यांची उपस्थिती होती .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख यांनी राम हा केवळ उपासनेचा विषय नसून तो एक विचार,आस्था आणि अस्मिता यांचा विषय असल्याचे सांगितले.  आपल्या अध्यक्षीय मनोगतात कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी मुलींच्या शिक्षणाचा वसा घेऊन श्यामराव देशमुख यांनी या संस्थेची उभारणी केली असे सांगून  महाविद्यालयाच्या जडणघडणीचा मागोवा आपल्या वक्तव्यात घेतला. यावेळी पुढे बोलताना अभय भंडारी यांनी सा

मोठ्या संख्येनं उपस्थित रहाण्याचे मुंडे परिवाराचे आवाहन

इमेज
  राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त तळेगाव येथे ह.भ. प. नाना महाराज कदम यांचे कीर्तन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी तालुक्यातील तळेगाव येथे ऐश्वर्यसंपन्न राष्ट्रीय संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त रामायणाचार्य प्रा. डॉ.ह.भ.प.नाना महाराज कदम यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परळी वैजनाथ पंचक्रोशितील नागरिकांनी कीर्तनास मोठ्या संख्येने उपस्थितीत राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.           राष्ट्रसंत भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्तिमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा त्रिवेणी समन्वय त्यांनी साधला होता. तो त्यांच्या कीर्तनातही दिसून येई. कीर्तनकार म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. आपल्या कीर्तनांतून ते जातिभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करीत. प्रबोधनकार्यासाठी त्यांनी मराठवाडा, विदर्भ , तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटकातील काही भाग व पश्‍चिम महाराष्ट्रासह उभा महाराष्ट्र पिंजून काढला. विठूनामाचा प्रचार करतानाच त्यांनी समत

शिक्षण माझा वसा' या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी संतोष सुतार यांची निवड

इमेज
  शिक्षण माझा वसा' या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी संतोष सुतार यांची निवड परळी वैजनाथ, शिक्षण विवेक आणि टी. बी. लुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशन, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद शाळा, महानगरपालिका शाळा, नगरपालिका शाळा, खासगी अनुदानित शाळा या शाळातील उपक्रमशील युवा शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी "शिक्षण माझा वसा पुरस्कार २०२४"  या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी एकूण सहा विभागातून नामांकने मागविण्यात आले होते. यामध्ये भाषा, गणित, विज्ञान, कला, तंत्रज्ञान आणि उपक्रमशील मुख्याध्यापक या सहा विभागांचा समावेश असून प्रत्येक विभागातून एका शिक्षकाची या प्रमाणे सहा शिक्षकांची निवड राज्यस्तरीय पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. यामध्ये परळी तालुक्यातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, नागापुर येथील उपक्रमशील  शिक्षक श्री. संतोष अंबादासराव सुतार यानी सादर केलेला नवोपक्रम "मी बुद्धिमान - डिजिटल स्वयं अध्ययनमाला" या उपक्रमाची दखल घेत तंत्रज्ञान या विभागातील पुरस्कारासाठी निवड झाल्याचे अभिनंदन पत्राद्वारे कळविले आहे. या पुरस्काराचे वितरण स. भ. म

वीज वाहक तार अंगावर पडून शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू !

इमेज
  वीज वाहक तार अंगावर पडून शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू !  ------------------------------- माजलगाव, दि.२५ (प्रतिनिधी)तालुक्यातील लोनगाव येथील सबस्टेशनला गेलेली वीज वाहक तर अंगावर पडल्याने जाग्यावरच होरपळून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली निपाणी टाकळी येथे घडली.     याबाबत अधिक माहिती अशी की, माजलगाव तालुक्यातील लोनगाव येथे महावितरण कंपनीचे सबस्टेशन आहे. या सबस्टेशन करिता वीज वाहक तर ही निपाणी टाकळी येथून गेलेली आहे. याच गावातील रहिवाशी बालासाहेब वैजनाथ पांडे (वय ६५ वर्षे) हे त्यांच्या शेतातून दैनदिन काम आटोपून आज दि.२५ गुरुवारी पहाटे घराकडे येत होते. या दरम्यान गावच्या स्मशानभूमी जवळ बालासाहेब पांडे आले असता सबस्टेशन गेलेली मुख्य वीज वाहक तर अंगावर पडली, त्यातच त्यांचा होरपळून मृत्यु झाला. या दुर्देवी घटनेने निपाणी टाकळी सह पंचक्रोशी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महावितरण दुरुस्ती बाबत गंभीर ? --------------------------- माजलगाव तालुक्यात अनेक ठिकाणी वीज वाहक तार, खांब हे धोकादायक परिस्थितीत आहेत. ह्यांच्या दुरुस्ती बाबत शेतकरी, ग्रामस्थ ह्यांच्याकडून तक्रार महावितरणकडे करून दुरुस्त

दुःखद बातमी :डॉ.देविदास मुंडे यांचे निधन

इमेज
  दुःखद बातमी :डॉ.देविदास मुंडे यांचे निधन नाथरा गावचे  ,परळी येथील प्रसिद्ध दातांचे डॉक्टर डॉ. देविदास मुंडे यांना आज पहाटे दीड च्या सुमारास देवाज्ञा झाली. सामाजिक कार्या सोबत परळी येथील जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या वैद्यनाथ महाविद्यालयायाच्या उपाध्यक्षपदी ते गेल्या काही वर्षांपासून कार्यभार सांभाळत होते.  त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे डॉक्टर पंचक्रोशीत प्रसिद्ध होते, आज दवाखान्यात उपचारादर दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली, त्यांच्या नंतर परिवारात तीन मुली दोन मुले नातवंड असा मोठा परिवार आहे. आज दुपारी 3.00 वाजता त्यांच्या पार्थिवावर परळी येथे अंतिम संस्कार होतील.

ना.धनंजय मुंडेंच्या हस्ते होणार स्पर्धेचे उद्घाटन

इमेज
  परळीत गुरुवारपासून रंगणार 'नामदार चषक' क्रिकेट स्पर्धेचा थरार! गुरुवारी सायंकाळी 5 वा. ना.धनंजय मुंडेंच्या हस्ते होणार स्पर्धेचे उद्घाटन परळी मतदारसंघातून 200 पेक्षा अधिक संघ होणार सहभागी - अजय मुंडे परळी वैद्यनाथ (दि. 24) - परळी वैद्यनाथ शहरात ना.धनंजय मुंडे हे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाण मार्फत आयोजित करण्यात येत असलेल्या 'नामदार चषक' 'डे - नाईट' क्रिकेट स्पर्धेच्या सामान्यांचा थरार उद्या (गुरुवार ता.25) पासून रंगणार आहे.  गुरुवारी सायंकाळी ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येईल. यासाठी शहरातील वैद्यनाथ महाविद्यालयासमोरील मैदान जिल्हा परिषदेचे गटनेते तथा स्पर्धेचे समन्वयक अजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुसज्ज करण्यात आले असुन, डे - नाईट सामन्यांच्या दृष्टीने आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.  सदर स्पर्धा ही परळी वैद्यनाथ मतदारसंघातल्या खेळाडूंसाठी राखीव असून, आतापर्यंत परळी शहरातील सुमारे 90 तर ग्रामीण मधून 110 पेक्षा अधिक संघांनी नोंदणी केली असल्याची माहिती स्पर्धेचे समन्वयक तथा बीड जिल्हा पर

एन . एस . एस . वैद्यनाथ कॉलेजच्या सौरभ सातपुतेची राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथसंचलनासाठी निवड

इमेज
  एन . एस . एस . वैद्यनाथ कॉलेजच्या सौरभ सातपुतेची राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथसंचलनासाठी निवड परळी -वै:  येथील एन . एस . एस विभाग, वैद्यनाथ कॉलेज, बी . एस्सी . तृतीय वर्गात शिकत असलेला राष्ट्रीय सेवा योजना स्वंयसेवक  सौरभ सातपुते दिंनाक २६ जानेवारी २०२४ , महाराष्ट्र राज्य,  राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथसंचलन , शिवाजी पार्क , दादर मुंबई येथील एस . आर . डी . परेड साठी डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगर च्या एन . एस . एस . विभागाचा प्रतिनिधी म्हणुन पथसंचलनत निवड झाली असून, तो उत्कृष्ट पथसंचलन विद्यापीठाने त्याची निवड केली आहे . या पथसंचलनात महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यापीठांचे प्रतिनिधी सहभागी असतात . त्यात सौरभ सातपुते हा हनुमान व्यायाम शाळा शिष्य आहे, उत्कृष्ट पथसंचलन करता आहे . प्रा डॉ . माधव रोडे यांच्या मार्गदर्शना खाली मागील तीन वर्षाया पासुन  सौरभ सातपुते नी निवासीय शिबिराचे नेतृत्व केले आहे . यापुर्वी वैद्यनाथ कॉलेजच्या एन .एस. एस . च्या अमोल शिंदे,  पौर्णिमा बारड, शेख वजिर यांनी पथसंचलनात विशेष प्राविण्य मिळवले होते . यावर्षीच्या पथसंचलनात  एन .

शेषेराव संपतराव कराड यांचे निधन

इमेज
  वैद्यनाथ बँकेचे व्हाईस चेअरमन रमेश कराड यांना पितृशोक शेषेराव संपतराव कराड यांचे निधन परळी, प्रतिनिधी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे, स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे यांचे मेहुणे शेषेराव संपतराव कराड यांना गुरुवार दि. 24 जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास देवाज्ञा झाली. वैद्यनाथ बँकेचे व्हाईस चेअरमन रमेश आप्पा कराड यांचे ते वडील होत. दिवंगत शेषेराव कराड यांच्या पार्थिवावर सायंकाळी पाच वाजता इंजेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.      लोकनेते गोपीनाथराव मुंडे, स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे यांचे मेहुणे, राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजाताई मुंडे, खासदार प्रीतमताई मुंडे यांच्या आत्याचे पती, वैजनाथ बँकेचे व्हाईस चेअरमन रमेशआप्पा कराड यांचे वडील शेषेराव संपतराव कराड यांचे वयाच्या 95 या वर्षी  निधन झाले. दिवंगत शेषराव कराड अतिशय धार्मिक व सुस्वभावी म्हणून सर्वत्र परिचित होते.  त्यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून शोक भावना व्यक्त होत आहेत. दिवंगत शेषराव कराड यांच्या पार्थिवावर  इंजेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी मंत्री पंडित

राज्य मागासवर्ग आयोगाकडून ब्राम्हणांना विचारणा- "को अहम् "!

इमेज
  राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणात संभ्रमित करणारे पर्याय: ब्राह्मण समाजाला पडला प्रश्न ;नेमका मी कोण ब्राह्मण ? परळी वैजनाथ, एमबी न्युज वृत्तसेवा....         राज्य मागासवर्ग आयोगाकडून करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणात खुल्या प्रवर्गातील जातींचेही सर्वेक्षण करण्यात येत आहे. मात्र हे सर्वेक्षण करताना ब्राह्मण जातीच्या नोंदी करत असताना विनाकारण ब्राह्मणांची नसलेली वर्गवारी करण्याचे पर्याय देण्यात आले आहेत. त्यामुळे ब्राह्मण समाज संभ्रमित झाला आहे. या सर्वेक्षणात नोंद करताना स्वतःला माहीत नसलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना मी कोण ब्राह्मण ? असा प्रश्न पडला आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणातील ही चुकीचे पर्याय काढून टाकावेत अशी मागणी ब्राह्मण समाजातून होत आहे.         राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात पर्याय निवडताना ब्राह्मण समाजात संभ्रम निर्माण झाला आहे.दिलेल्या पर्यायात मी कोण? असा प्रश्न पडला आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुंटुबांची माहिती प्रश्नावलीद्वारे भरून घेण्

उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कारकुनास ३० हजाराची लाच घेतांना पकडले

इमेज
  उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कारकुनास ३० हजाराची लाच घेतांना पकडले   -- माजलगाव .... येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कारकुन वैभव जाधव यास बीड एसीबी अधिकाऱ्यांनी तीस हजाराची लाच घेताना बुधवार रोजी दुपारी तीन वाजता ताब्यात घेण्यात आले.  माजलगाव विभागीय कार्यालतील कारकुन वैभव जाधव यांच्याकडे या कार्यालयातील गौण खनिज व जातीचे प्रमाणपत्र हे विभाग होते. पकडलेली वाळूची गाडी सोडण्यासाठी  तीस हजार रुपयाची लाच  घेतांना पकडण्यात बीड एसीबीच्या अधिका-यांनी रंगेहाथ पकडले. 

राज्य मागासवर्ग आयोगाकडे मागणी

इमेज
  ब्राह्मण समाजाला संभ्रमित करू नका: राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणातील चुकीचे पर्याय काढून टाका- बाजीराव भैया धर्माधिकारी परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         राज्य मागासवर्ग आयोगाकडून करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणात खुल्या प्रवर्गातील जातींचेही सर्वेक्षण करण्यात येत आहे. मात्र हे सर्वेक्षण करताना ब्राह्मण जातीच्या नोंदी करत असताना विनाकारण ब्राह्मणांची नसलेली वर्गवारी करण्याचे पर्याय देण्यात आले आहेत. हा एक प्रकारे ब्राह्मण जातीला विखुरण्याचा डाव असून शासनाने ब्राह्मण समाजाला संभ्रमित करू नये. राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणातील ही चुकीचे पर्याय काढून टाका अशी मागणी ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे राज्य समन्वयक तथा परळी वैजनाथ चे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी केली आहे.       महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात पर्याय निवडताना ब्राह्मण समाजात संभ्रम निर्माण झाला आहे.दिलेल्या पर्यायात मी कोण? असा प्रश्न पडला आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुंटुबा

परळीचे भूमिपुत्र असलेल्या मराठी उद्योजकाचे ॲल्‍युमनिअम कास्टिंगद्वारे आत्‍मनिर्भर भारतासाठी मोठे योगदान

इमेज
  अयोध्येच्या अमृत भारत रेल्वेला पुण्याच्या तौराल इंडिया कंपनीचे गिअर बॉक्स! परळीचे भूमिपुत्र असलेल्या मराठी उद्योजकाचे ॲल्‍युमनिअम कास्टिंगद्वारे आत्‍मनिर्भर भारतासाठी मोठे योगदान   पुणे : ‘तौराल इंडिया’ ही जागतिक पातळीवर एकात्मिक अल्‍युमिनियम धातूओतकाम क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. ही कंपनी आता भारतीय रेल्‍वेसोबतही काम करत असून, देशाला अद्‌यावत तंत्रज्ञानाच्या उपलब्‍धीसह देश आत्मनिर्भर होण्याच्या प्रवासात ही कंपनी एक मैलाचा दगड ठरावा, इतपत आपले योगदान देत आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू झालेल्या अयोध्या येथील अमृत भारत एक्स्प्रेस रेल्वेसाठी पुण्यातील ‘तौराल इंडिया’ या मराठी उद्योजकाच्या कंपनीने ॲल्‍युमनिअम कास्टिंग सोल्यूशन पुरवले आहे. या अमृत भारत रेल्वेसाठी तौराल इंडियाने गिअर बॉक्सची निर्मिती केली. यापूर्वी हे तंत्रज्ञान व उत्पादने जर्मनीहून आयात करावी लागत होती, अशी माहिती तौराल इंडिया चे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक भरत गिते यांनी दिली. WAP5 या इलेक्ट्रिक लोकोमोटीव वर्गवारीतील इंजिनची निर्मिती हा एक रेल्वे विभागाचा महत्वाचा उद्योग आहे.

उद्घाटनासाठी धनंजयजी गुडसूरकर यांची उपस्थिती

इमेज
 स्व.श्यामराव देशमुख स्मृतिसमारोह :सुप्रसिद्ध व्याख्याते अभय भंडारी, डॉ.विश्वाधार देशमुख, यांच्या व्याख्यानांचे आयोजन  उद्घाटनासाठी  धनंजय गुडसूरकर यांची उपस्थिती     परळी, दि. २४/०१/२०२४( प्रतिनिधी )    येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व.श्यामराव देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.संस्थेचे अध्यक्ष संजय  देशमुख,सचिव रवींद्र देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणाऱ्या  या कार्यक्रमाचे उद्‌घाटन  धनंजय गुडसुरकर , (सदस्य महा .राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ . ) यांच्या शुभहस्ते आज दि.२४ / ०१ / २०२४ रोजी सकाळी ११:०० वा. संपन्न होणार आहे . तसेच सायं. ६:०० वा . मा.अभय भंडारी (विटा - सांगली) यांचे 'रामायण,महाभारत आणि आजचे जीवन'या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान आयोजित केले आहे.यावेळी स्मृतिसमारोहानिमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण होईल.         उद्या दि.२५ /०१ / २०२४ सायं. ६:०० वा. डॉ. विश्वाधार देशमुख यांचे 'भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥ 

नमो चषक स्पर्धेचे बक्षीस वितरण थाटात

इमेज
    नमो चषक : पंकजा मुंडे, खा.डाॅ.प्रितम मुंडेंच्या हस्ते विजेत्यांनी स्विकारली  बक्षिसं नमो चषक स्पर्धेचे बक्षीस वितरण थाटात ; व्हाॅलीबाॅलच्या टीपीएस काॅलनी संघाने पटकावले २१ हजाराचे बक्षीस परळी वैजनाथ।दिनांक २३। भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने नमो चषक अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते रोख रक्कमेची बक्षीस देण्यात आली. व्हाॅलीबाॅल स्पर्धेत टीपीएस काॅलनी संघाने विजेतेपद पटकावले, हा  संघ २१ हजाराच्या बक्षीसाचा मानकरी ठरला.    शक्तीकुंज वसाहतीमधील भेल स्कूलच्या केजी हाॅलमध्ये हा बक्षीस वितरणाचा सोहळा मोठ्या थाटात पार पडला. भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, भा.शि. प्र.संस्थेचे कार्यवाह हेमंत वैद्य, वसंतराव देशमुख, विकासराव डुबे, शांतीलाल जैन, रामभाऊ कुलकर्णी, अमरनाथ खुर्पे, विष्णुपंत कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते. बक्षीस वितरणापूर्वी भेल स्कूलच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन पंकजाताई व खा.प्रितमताई यांच्या हस्ते विधिवत पूजन करून झाले.     नमो चषकमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना वाव म