एन . एस . एस . वैद्यनाथ कॉलेजच्या सौरभ सातपुतेची राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथसंचलनासाठी निवड

 एन . एस . एस . वैद्यनाथ कॉलेजच्या सौरभ सातपुतेची राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथसंचलनासाठी निवड




परळी -वै:  येथील एन . एस . एस विभाग, वैद्यनाथ कॉलेज, बी . एस्सी . तृतीय वर्गात शिकत असलेला राष्ट्रीय सेवा योजना स्वंयसेवक  सौरभ सातपुते दिंनाक २६ जानेवारी २०२४ , महाराष्ट्र राज्य,  राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथसंचलन , शिवाजी पार्क , दादर मुंबई येथील एस . आर . डी . परेड साठी डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगर च्या एन . एस . एस . विभागाचा प्रतिनिधी म्हणुन पथसंचलनत निवड झाली असून, तो उत्कृष्ट पथसंचलन विद्यापीठाने त्याची निवड केली आहे . या पथसंचलनात महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यापीठांचे प्रतिनिधी सहभागी असतात . त्यात सौरभ सातपुते हा हनुमान व्यायाम शाळा शिष्य आहे, उत्कृष्ट पथसंचलन करता आहे . प्रा डॉ . माधव रोडे यांच्या मार्गदर्शना खाली मागील तीन वर्षाया पासुन  सौरभ सातपुते नी निवासीय शिबिराचे नेतृत्व केले आहे . यापुर्वी वैद्यनाथ कॉलेजच्या एन .एस. एस . च्या अमोल शिंदे,  पौर्णिमा बारड, शेख वजिर यांनी पथसंचलनात विशेष प्राविण्य मिळवले होते . यावर्षीच्या पथसंचलनात  एन . एस . एस . ची  सौरभ सातपुते च्या निवडी  बद्दल जवाहर एज्युकेशन सोसायटीचे सचिव दत्ताप्पा ईटके गुरूजी यांनी विशेष अभिनंदन करून शुभेच्छा दिल्य . तसेच  प्राचार्य डॉ . रमेश राठोड, एन . एस . एस . विभाग प्रमुख  प्रा . डॉ . माधव रोडे  व प्रा . डॉ . भिमानंद गजभारे , विश्वजीत हाके, राम फड, अर्पणा ओपळे, दिव्या भोयटे, अभिजीत रोडे, पयाल शिंदे , सोनाली आचार्य, आरती शिंदे  अदिनी  अभिनंदन केले हार्दिक शुभेच्छा दिल्या .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार