शिस्तबध्द ग्रंथदिंडीने परळीकरांचे लक्ष वेधले!

 परळीत कोष्टी समाजाच्या वतीने आयोजित श्री रामलिंग चौंडेश्वरी देवी उत्सवाची थाटात सांगता


बाल कीर्तनकार ह.भ.प.गौरी हरेगावकर यांचे कीर्तन; 

परळी/संतोष जुजगर- 

होमहवण, ग्रंथदिंडी, काल्याचे किर्तन व महाप्रसादाने गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या श्री रामलिंग चौंडेश्वरी देवी देवांग पुराण पारायण  सोहळा मोठ्या थाटा- माटात पार पडला. कोष्टी समाजाने आयोजित केलेल्या  कार्यक्रमांचा परळी व पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घेतला. शिस्तबध्द पध्दतीने निघालेल्या ग्रंथदिंडीकडे परळीकरांचे लक्ष वेधले. लहान मुलांच्या हातातील भगवे पताके , रामलिंग चौंडेश्वरी मातेचा व  रामकुष्ण हरी  चा जयघोषाने परळीनगरी दणाणली होती. टाळ- मृदंग  यामुळे सर्वजण मंञमुग्ध झाले होते. 

         शहरातील गुरूकृपानगर येथील श्री हनुमान मंदिर येथे दि.25 जानेवारी रोजी रोजी श्री रामलिंग चौंडेश्वरी देवांग पुराण पारायण व मान्यवरांच्या उपस्थीत ग्रथंपुजा करून प्रारंभ करण्यात आला होता. या वेळी मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थीती लाभत होती. पारायण व्यासपीठ प्रमुख म्हणून सौ. सोनाली हरेगांवकर या होत्या. 

     या सप्ताहाची सांगता दि. 25 जानेवारी 2024 रोजी सकाळी 6 वा.होमहवन, 10 ते 12 ग्रंथदिंडी, दुपारी 11 ते 1 बालकीर्तनकार ह.भ. प.कु.गौरी हरेगावकर यांचे काल्याचे किर्तन व त्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. किर्तनाचा व महाप्रसादाचा हजारों भाविकांनी लाभ घेतला.


*पालखी व ग्रंथदिंडीचे विविध ठिकाणी स्वागत.... 

        सप्ताहाच्या समारोपाप्रसंगी काढण्यात आलेल्या श्री रामलिंग चौंडेश्वरी देवीच्या प्रतिमेची पालखी व ग्रंथदिंडीचे विविध ठिकाणी रांगोळीची आरास व पुजा करून भाविकांनी दर्शन घेतले. टाळ- मृदंग, रामलिंग चौंडेश्वरी देवीचा जयघोष, रामकुष्ण हरिचा गजर , महिला, पुरूष, अबाल वृध्दांनी घातलेले फेटे,  फटाक्यांची अतिषबाजी, फुगडया, भजन याकडे परळीकरांचे लक्ष वेधले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !