इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

आरोग्य हॉस्पिटल व अ‍ॅडव्हान्स्ड लॅप्रोस्कोपी सेंटरचा २६ जानेवारीला शुभारंभ

 ना.धनंजय मुंडे,खा.डाॅ.प्रितम मुंडे यांच्या उपस्थितीत आरोग्य हॉस्पिटल व अ‍ॅडव्हान्स्ड लॅप्रोस्कोपी सेंटरचा २६ जानेवारीला शुभारंभ



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....जनरल व लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. संतोष रघुनाथ मुंडे व स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ. प्रज्ञा मुंडे (ढाकणे) यांच्या आरोग्य हॉस्पिटल व अ‍ॅडव्हान्स्ड लॅप्रोस्कोपी सेंटरचा ना.धनंजय मुंडे,खा.डाॅ.प्रितम मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवार, २६ जानेवारी २०२४  सायं.६ वा.होणार आहे.
      आरोग्य हॉस्पिटल व अ‍ॅडव्हान्स्ड लॅप्रोस्कोपी सेंटरचा नाथ रोड, कृष्णा टॉकीजच्या बाजुला, नेहरू चौक (तळ), परळी वैजनाथ येथे शुभारंभ करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. अशोक बडे (जिल्हा शल्य चिकित्सक, बीड.),डॉ. उल्हास गंडाळ( जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड.),डॉ. लक्ष्मण मोरे (तालुका आरोग्य अधिकारी, परळी वै.),डॉ. अरूण गुट्टे (वैद्यकीय अधिक्षक, परळी वै.),डॉ. राजेश दरडे (वैष्णवी हॉस्पिटल, लातूर),डॉ. प्रदिप हुशे (जालना हॉस्पिटल, जालना),डॉ. शालिनी कराड (कराड हॉस्पिटल, परळी वै.),डॉ. बालासाहेब कराड (कराड हॉस्पिटल, परळी वै.) ,डॉ. ज्ञानेश्वर घुगे अध्यक्ष,( पी.एम.ए., परळी वै.),डॉ. सतिश गुठे( सचिव, पी.एम.ए., परळी वै.),डॉ. अजित केंद्रे (अध्यक्ष, आय.एम.ए., परळी वै.),डॉ. विजय रांदड (सचिव, आय.एम.ए., परळी वै.) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
       तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन रघुनाथ अर्जुन मुंडे,गोविंद रघुनाथ मुंडे, डाॅ. संतोष रघुनाथ मुंडे,डॉ. प्रज्ञा मुंडे (ढाकणे) यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या